दरम्यान, पोस्टरमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. दीपिकाच्या या लूकचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने या लूकमध्ये तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा. दीपिकाचे हे स्पेशल पोस्टर शेअर केल्यानंतर ‘पद्मावती’च्या टीमने चित्रपटातील दुसºया महत्त्वाच्या ‘महारावल रतन सिंह अर्थात शाहिद कपूरचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये शाहिद खूपच दमदार भूमिकेत असल्याचे दिसत आहे. लोकांकडून त्याचा हा अंदाज खूप पसंत केला जात आहे.
मात्र अद्यापपर्यंत अल्लाउद्दीन खिलजी अर्थात रणवीर सिंगचे पोस्टर अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने चाहत्यांना त्याच्या लूकविषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे. रणवीरचा लूक केव्हा समोर येईल याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जात आहे. परंतु चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधाची धार बघावयास मिळत असल्याने, चित्रपटाच्या रिलीजवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच करणी सेनेच्या वतीने दीपिकाच्या पोस्टरची होळी केली होती. तसेच सुरुवातीला चित्रपटाच्या सेटचीही तोडफोड केली होती. आता चित्रपटाची जवळपास शूटिंग पूर्ण झाली असून, रिलीजवरून निर्माते आणि करणी सेनेच्या पदाधिकाºयांमध्ये वाद सुरू आहे. करणी सेनेच्या पदाधिकाºयांच्या मते, हा चित्रपट रिलीज करण्याअगोदर आम्हाला काही इतिहासकारांना दाखविण्यात यावा.