फराह नाजबद्दल हे काय बोलून गेलेत ऋषी कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 15:42 IST
ऋषी कपूर म्हणजे एकदम तोडफोड व्यक्तिमत्त्व. मनात येईल ते अगदी बेधडकपणे बोलायचे आणि मोकळे व्हायचे, असे ऋषी कपूर अनेकदा ...
फराह नाजबद्दल हे काय बोलून गेलेत ऋषी कपूर?
ऋषी कपूर म्हणजे एकदम तोडफोड व्यक्तिमत्त्व. मनात येईल ते अगदी बेधडकपणे बोलायचे आणि मोकळे व्हायचे, असे ऋषी कपूर अनेकदा करतात. आपल्या या स्वभावामुळे ते अनेकदा वादात सापडले. पण त्यांनी कसलीच पर्वा केली नाही. हे सांगायला कारण म्हणजे गतकाळातील एक गाजलेली अभिनेत्री फराह नाज हिच्याबद्दल ऋषी कपूर असेच काही बोलून गेलेत.खरे तर ऋषी कपूर यांनी फराहची प्रशंसा केली. पण प्रशंसा करता करता, फराह unprofessionl असल्याचेही ते बोलून गेलेत. नव्वदीच्या दशकात फराह अनेक चित्रपटांत झळकली. ऋषी कपूरसोबतही तिने काही चित्रपट केलेत. पण आज अचानक ऋषी कपूर यांना फराहची आठवण आली. twitterवर त्यांनी फराहचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि सोबतच एक ‘विचित्र मॅसेज’. }}}}‘फराह नाज ही तब्बूची बहीण आणि बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री. प्रोफेशनल असती तर फराह आज एक मोठी अभिनेत्री राहिली असती,’ असे tweet ऋषी यांनी केले. म्हणजेच काय तर इशाºया इशाºयात फराह प्रोफेशन नव्हती, हेच ते सांगून गेले.१९८५ मध्ये फराहने यश चोप्रांच्या ‘फासले’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर फराहने राजेश खन्नांपासून ऋषी कपूर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मिथुन, गोविंदा अशा अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. २००५मध्ये आलेला ‘शिखर’ तिचा अखेरचा सिनेमा होता. फराहने अनेक हिट सिनेमे दिले. पण या यशासोबतच एक अपयशाचा काळही तिला पाहावा लागला. यादरम्यान तिने दारा सिंहचा मुलगा विंदू दारा सिंह याच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला. पण हे लग्न काहीच वर्षे टिकले. तशीच फरहा चित्रपटसृष्टीतून दिसेनासी झाली.