Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे रहस्य धर्मेद्र आणि शर्मिला यांच्या नात्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:43 IST

धर्मेद्र आणि शर्मिला टागोर यांची जोडी ठरली हिट: Read More News On Cnxmasti

साठच्या दशकात रुपेरी पडद्यावरील धर्मेंद्र आणि शर्मिला दोघांचा रोमँटिक अंदाज रसिकांना चांगलाच भावला. दोघांच्या प्रत्येक सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र याच जोडीनं रसिकांच्या मनावर गारुड घातलं. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला रसिकांनी भरभरून दादही दिली. हृषिकेश मुखर्जी यांनी दोघांना पहिल्यांदा एकत्र आणले ते 1966 च्या 'अनुपमा' सिनेमात. दोघांचा अभिनय आणि अफलातून केमिस्ट्री यामुळे रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतले.याच जादूमुळे पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसली ती 'देवर' या सिनेमात. यांत धर्मेंद्र यांनी शर्मिला यांच्या दिराची भूमिका साकारली असली तरी सिनेमातील दोघांची जोडी रसिकांना भावली. दोघांच्या यकीन सिनेमाने तर बॉक्स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडले. या सिनेमात अभिनयापेक्षा जास्त चर्चा झाली ती दोघांच्या रोमँटीक मिडनाईट सीन्सची.'यकीन'नंतर मेरे हमदम मेरे दोस्त','चुपके चुपके', 'देवदास' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमा या जोडीने दिले. शर्मिला आणि धर्मेंद्र दोघांची मैत्री खास होती. त्यामुळे साहजिकच या मैत्रीची झलक रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. योगायोग म्हणजे या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला असतो. धर्मेंद्र यांनी 81 व्या वर्षात तर शर्मिला टागोर यांनी 71 व्या वर्षात पदार्पण केले आहे. दोघांमध्ये 9 वर्षाच्या फरक असला तरी दोघांच्या अभिनयात आणि केमिस्ट्रीमध्ये तो कधीही जाणवला नाही. दोघांवर चित्रीत करण्यात आलेले ''यकींन कर लो मुझे मोहब्बत है तुमसे'' हे गाणेही खास आणि तितक्याच मजेशीर अंदाजात चित्रीत करण्यात आलं होतं. यातील धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांची ड्रेसिंग स्टाईल लक्षवेधी होती. त्यामुळे या-ना त्या पद्धतीने ही जोडी कायमच रसिकांच्या चर्चेत राहिली.