ALSO READ : संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त हिने रेड बिकनीत लावली आग !
संजयच्या एका जवळच्या मित्राच्या मते, मान्यताने बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी हे फोटो सोशल मीडियावर टाकलेत. कदाचित मान्यताला चित्रपटात आपली दुसरी इनिंग सुरू करायची आहे आणि यासाठी तिचा हा खटाटोप होता. अर्थात संजय यासाठी कधीही तयार होणार नाही.
होय, संजय पत्नीला सिनेमात काम करण्याची परवानगी देईल, याची शक्यता कमी आहे. कारण माझ्या कुटुंबातील महिला चित्रपटांत काम करणार नाहीत, असे संजयने यापूर्वी अनेकदा सांगितल्याचे आपण ऐकले आहे. संजयचे वडील सुनील दत्त यांनीही आपल्या मुलींना सिनेमात येण्याची परवानगी नाकारली होती आणि संजय सुद्धा हीच परंपरा पुढे नेत आहे. संजयची मुलगी त्रिशाला ही बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक आहे.पण संजयने तिला यासाठी नकार दिल्याची बातमी मध्यंतरी होती. एवढेच नाही तर संजयने स्वत: एका पत्रपरिषदेत याबद्दल एक धाडसी विधान केले होते. त्रिशाला अॅक्टिंगमध्ये येऊ इच्छित असेल तर मी तिचे पाय तोडेल, असे तो म्हणाला होता. आता पत्नी मान्यतासोबत तो कसा विचार करतो, ते येणारा काळ सांगेलच.