Join us

​काय?? पत्नी मान्यता दत्तचे बिकनी फोटो पाहून भडकला संजय दत्त!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:17 IST

अगदी अलीकडे संजय दत्तची बेटर हाफ मान्यता दत्त चर्चेत आली होती. या चर्चेचे कारण होते, मान्यताचे कमालीचे हॉट अ‍ॅण्ड ...

अगदी अलीकडे संजय दत्तची बेटर हाफ मान्यता दत्त चर्चेत आली होती. या चर्चेचे कारण होते, मान्यताचे कमालीचे हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो. मान्यताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये मान्यताचे अनेक बिकनीतील फोटो होते. तिचे हे फोटो शेअर करताच क्षणात व्हायरल झाले होते. विशेषत: तिच्या लाल बिकनीतील फोटोने तर इंटरनेटवर आग लावली होती. पण हेच फोटो म्हणे संजयच्या नाराजीचे कारण ठरले आहेत. मीडियातील चर्चा खरी मानात, संजूबाबा म्हणे पत्नीच्या या हॉट बिकनी फोटोंवरून बिथरला आहे. मान्यताने असे फोटो शेअर केल्यामुळे तो निराश आहे. ALSO READ : संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त हिने रेड बिकनीत लावली आग !संजयच्या एका जवळच्या मित्राच्या मते, मान्यताने बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी हे फोटो सोशल मीडियावर टाकलेत. कदाचित मान्यताला चित्रपटात आपली दुसरी इनिंग सुरू करायची आहे आणि यासाठी तिचा हा खटाटोप होता. अर्थात संजय यासाठी कधीही तयार होणार नाही.होय, संजय पत्नीला सिनेमात काम करण्याची परवानगी देईल, याची शक्यता कमी आहे. कारण माझ्या कुटुंबातील महिला चित्रपटांत काम करणार नाहीत, असे संजयने यापूर्वी अनेकदा सांगितल्याचे आपण ऐकले आहे. संजयचे वडील सुनील दत्त यांनीही आपल्या मुलींना सिनेमात येण्याची परवानगी नाकारली होती आणि संजय सुद्धा हीच परंपरा पुढे नेत आहे. संजयची मुलगी त्रिशाला ही बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक आहे.पण संजयने तिला यासाठी नकार दिल्याची बातमी मध्यंतरी होती. एवढेच नाही तर संजयने स्वत: एका पत्रपरिषदेत याबद्दल एक धाडसी विधान केले होते. त्रिशाला अ‍ॅक्टिंगमध्ये येऊ इच्छित असेल तर मी तिचे पाय तोडेल, असे तो म्हणाला होता. आता पत्नी मान्यतासोबत तो कसा विचार करतो, ते येणारा काळ सांगेलच.