काय? माहिरा खानला डेट करतोयं रणबीर कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:00 IST
रणबीर कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, पण यावेळी कुठल्या दिग्दर्शकाच्या भांडणामुळे वा त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे तर एका ...
काय? माहिरा खानला डेट करतोयं रणबीर कपूर?
रणबीर कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, पण यावेळी कुठल्या दिग्दर्शकाच्या भांडणामुळे वा त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे तर एका अभिनेत्रीसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे. बी-टाऊनमधील चर्चा खरी मानाल तर कॅटरिना कैफनंतर रणबीर कपूर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला डेट करत असल्याची खबर आहे. रणबीर अलीकडे सतत माहिरा...माहिरा...करत असतो. आपल्या सर्व मित्रांना त्याच्या फोनमधील माहिराचे फोटो दाखवत सुटतो. त्यामुळे माहिरा व रणबीर या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही सुरू आहे, असे रणबीरचे मित्र कुजबुजतं आहेत. अलीकडे एका मुलाखतीत रणबीर माहिराचे तोंडभरून कौतुक करताना दिसला होता. सगळ्यांत सुंदर अभिनेत्री तुला कोण वाटते? असे रणबीरला विचारले असता माहिरा खान मला सर्वाधिक सुंदर अभिनेत्री वाटते, असे उत्तर त्याने दिले होते. गतवर्षी एका अवार्ड सेरेमनीमध्ये रणबीर व माहिरा दोघेही एकत्र दिसले होते. एकमेकांसोबत दोघेही बरेच कम्फर्टटेबल होते. माहिरासोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर रणबीर अद्याप काही बोललेला नाही. पण माहिरा खानने मात्र यावर आपली चुप्पी तोडली आहे. चुप्पी काय? या बातम्यांवर ती भलतीच भडकली आहे. माहिराचे मानाल तर या सगळ्या अफवा आहेत. गेल्या वर्षभरापासून माझ्यात व रणबीरमध्ये अफेअर असल्याच्या वावड्या उठत आहेत. पण असे काहीही नाही. आम्ही अवार्ड फंक्शनमध्ये भेटलो आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. पण या मैत्रीचा अर्थ आम्ही एकमेकांना डेट करतोय, असा अजिबात नाही. आमच्यात केवळ मैत्री आहे, असे तिने सांगितलेयं माहिराआधी रणबीर कॅटरिना कैफला डेट करत होता. दोघांचेही प्रेम चांगलेच बहरले होते. पण अचानक दोघांचे बे्रकअप झाले. मध्यंतरी रणबीर आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार, अशीही खबर होती.