Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्लीज पुढे जा, नाहीतर लोक..."; शाहिद कपूरला वृद्ध व्यक्ती काय म्हणाला? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:17 IST

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावरील या व्हिडीओमध्ये शाहिदच्या साधेपणाने आणि त्याच्यापुढे उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या कृत्याने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. असं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावरील या व्हिडीओमध्ये शाहिदच्या साधेपणाने आणि त्याच्यापुढे उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या कृत्याने नेटीझन्सची मने जिंकली आहेत. असं काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर विमानतळाच्या बाहेर सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभा होता. त्याच्या अगदी पुढे एक वृद्ध व्यक्ती उभा होता. त्यांनी जेव्हा मागे वळून पाहिले की स्वतः शाहिद कपूर त्यांच्या मागे उभा आहे, तेव्हा त्यांनी मोठ्या आदराने शाहिदला विनंती केली. ते म्हणाले, "सर, प्लीज तुम्ही पुढे जा, नाहीतर लोक तुमच्याभोवती इथेच गर्दी करतील."


सुरुवातीला शाहिदने आढेवेढे घेतले आणि त्यांनाच आधी जाण्यास सांगितले, मात्र त्या वृद्ध व्यक्तीने हट्ट केल्याने अखेर शाहिद त्यांच्या पुढे गेला. या प्रसंगाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

शाहिद आणि त्या वृद्ध व्यक्तीमधील हा संवाद पाहून नेटीझन्स भारावून गेले आहेत. एका युजरने लिहिले की, "शाहिदच्या पुढे उभे असलेले काका सुसंस्कृतपणाचं उत्तम उदाहरण आहेत." दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, "शाहिदने हेच कमावले आहे, त्याला ज्येष्ठ व्यक्तींकडून इतका सन्मान मिळत आहे." अनेकजण शाहिदच्या नम्र स्वभावाचेही कौतुक करत आहेत.

शाहिद कपूरचं वर्कफ्रंट

शाहिद कपूर नुकताच विशाल भारद्वाज यांच्या ‘ओ रोमियो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले असले, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. आता शाहिदचा पुढचा चित्रपट 'कॉकटेल २' १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elderly man's sweet gesture to Shahid Kapoor wins hearts online.

Web Summary : A video of Shahid Kapoor at Mumbai airport is viral. An elderly man requested Shahid to go ahead in the queue to avoid crowding. Shahid initially hesitated but obliged after the man insisted. Netizens are praising the sweet exchange and Shahid's humility.