Join us

​असे काय घडले की टीव्ही अभिनेत्रीने मारली बॉबी देओलच्या थोबाडीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:10 IST

अभिनेत्री समीक्षा भटनागर म्हणजे, टीव्हीवरचा एक लोकप्रीय चेहरा. अलीकडे समीक्षाने म्हणे बॉबी देओलच्या श्रीमुखात लगावली. आता हा सगळा काय ...

अभिनेत्री समीक्षा भटनागर म्हणजे, टीव्हीवरचा एक लोकप्रीय चेहरा. अलीकडे समीक्षाने म्हणे बॉबी देओलच्या श्रीमुखात लगावली. आता हा सगळा काय मामला आहे, हे तर कळायलाच हवे. शेवटी एका टीव्ही अ‍ॅक्ट्रेसने बॉबीच्या थोबाडीत मारणे, म्हणजे अतिच झाले. पण थांबा...थांबा... तुम्ही समजतायं असे काही नाही. हा किस्सा घडलाय. पण रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. म्हणजेच, ‘पोस्टर ब्वॉईज’ या चित्रपटाच्या सेटवर.ALSO READ : ​‘पोस्टर ब्वॉईज’चा मजेशीर ट्रेलर तुम्ही पाहिलात का?समीक्षा  या चित्रपटात बॉबीच्या बेटरहाफ बनली आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ही मजेशीर घटना घडली. समीक्षाला बॉबीवर नाराज होऊन त्याला जोरदार चपराक मारायची असते, असा एक सीन होता. पण आपल्या भूमिकेत समीक्षा अशी काही शिरली की, बॉबीला थोबाडीत मारताना समीक्षाच्या स्वत:च्या हातालाही दुखापत झाली. खरे तर बॉबीला मारताना समीक्षा मनातून चांगलीच घाबरली होती. शेवटी घाबरणार का नाही, बॉबी शेवटी पडला बॉलिवूडचा सिनिअर अभिनेता. एवढ्या सिनीअर अभिनेत्याला थोबाडीत मारायचे म्हणजे, समीक्षा घाबरणारच की. पण बॉबीने समीक्षाची ही समस्या बरोबर हेरली आणि त्याने समीक्षाचे अवघडलेपण दूर केले. याबाबत समीक्षाने सांगितले की, मला बॉबीला मारायचे होते. माझ्यासाठी हे काम चांगलचे कठीण होते. शेवटी मी शॉट दिला. पण तो देताना बॉबीला मी इतक्या जोरात मारले की, त्याला मारताना मलाही लागले. यानंतर तर मी कमालीचे नव्हर्स झाले. बॉबी मला काहीही बोलला नाही. उलट त्याने मला हा शॉट द्यायला मदतच केली. पण मी यानंतर अनेकदा बॉबीची माफी मागितली. पण हा केवळ एक सीन समजून बॉबी सगळेच विसरला होता.काही दिवसांपूर्वीच ‘पोस्टर ब्वॉईज’चा ट्रेलर रिलीज झाला. ‘पोस्टर ब्वॉईज’ हा चित्रपट श्रेयस तळपदेच्या याच नावाच्या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. मराठीत हा चित्रपट लोकांना चांगलाच भावला होता आणि सुपरहिट ठरला होता.  आता हाच चित्रपट हिंदीत येतो आहे. निश्चितपणे या चित्रपटात भरपूर कॉमेडी असणार, हे सांगणे नकोच. चित्रपटातील कथा तीन पात्रांभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट तीन हमालांची रिअल लाईफ स्टोरी असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे श्रेयस दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवतो आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.