Join us
Daily Top 2Weekly Top 5

फवादला झाले तरी काय...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 19:39 IST

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता जितका देखणा आहे तितकाच तो शांत अन् संयमीही आहे. त्याच्या याच गोड गुण-वैशिष्टयांमुळे तो ...

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता जितका देखणा आहे तितकाच तो शांत अन् संयमीही आहे. त्याच्या याच गोड गुण-वैशिष्टयांमुळे तो अनेक तरुणींच्या गळयातला ताईत झालाय. परंतु काल-परवा त्याचे एक भलेतच रुप लोकांना पाहावे लागले. दिल्ली येथे आयोजित इंडिया कॉचर फॅशन वीक या मनीष मल्होत्राच्या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सहभागी झाले होते. त्यांच्यात फवादही होता. परंतु या पार्टीत त्याच्यावर मद्याचा कैफ इतका हावी झाला की तो अचानक जोराजोरात ओरडायला लागला. त्याच्या शेजारी उभे असलेल्यांशी अभद्र व्यवहार करू लागला. अखेर काही जणांनी अथक प्रयत्नाने त्याला शांत केले. परंतु शांत, संयमी फवादचे हे नवे रुप पाहून पार्टीत उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. यशाची नशा फवादच्या डोक्यात गेली म्हणून तो असा वागतोय, अशी प्रतिक्रिया पाटीर्तील सेलेब्रिटी व्यक्त करीत होते. पण, ती ऐकायला फवादचे डोके कुठे ठिकाणावर होते?