प्रसिद्ध निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान(Farah Khan)च्या व्लॉगमुळे तिचा बराच काळ कुक असलेला दिलीप सोशल मीडिया स्टार बनला आहे. श्रुती हासन(Shruti Hassan)च्या मुंबईतील घरी चित्रीत केलेल्या तिच्या नवीन व्लॉगमध्ये, फराहने दिलीपला तिच्या युट्यूब व्हिडीओंमध्ये दिसण्यासाठी वेगळे पैसे मिळतात की रॉयल्टी मिळते या प्रश्नाचे उत्तर दिले.
श्रुती हासनच्या घरी फराह आणि दिलीपने श्रुतीने बनवलेले सांभर आणि डोसे खाल्ले. श्रुतीने तिच्या पियानोवर एक धून वाजवून आणि एक गाणे गायले. त्यावेळी फराहने खुलासा केला की, दिलीपने शंकर महादेवन यांच्यासोबत 'मेरी पगार वाढाओ' नावाचे एक गाणे देखील रेकॉर्ड केले होते. श्रुतीने थेट फराह खानला विचारले, 'दिलीपला यूट्यूब व्हिडीओंसाठी अतिरिक्त रॉयल्टी किंवा अतिरिक्त फी मिळते का?' फराहने उत्तर दिले, ''हो, त्याला खूप काही मिळते. इथे सर्व मिळून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त.'' श्रुती म्हणाली, ''आम्हाला फक्त दिलीपची काळजी होती,'' ज्यावर फराह गमतीने म्हणाली, ''त्याची काळजी करू नकोस, माझी काळजी कर.''
व्लॉगच्या माध्यमातून फराह आणि दिलीपने जिंकले सर्वांची मनं२०२४ मध्ये त्यांची युट्यूब कुकिंग सीरिज सुरू झाल्यापासून, फराह खान आणि तिचा कुक दिलीप यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एका साध्या कुकिंग सेशनपासून सुरू झालेली ही सीरिज एका प्रसिद्ध वेबसीरिज स्टाईल व्लॉगमध्ये रूपांतरित झाली. केवळ पाककृतींनीच नव्हे तर त्यांच्यातील गोड मैत्रीनेही रसिकांच्या मनात घर केले. दिलीप लवकरच चाहत्यांचा आवडता बनला. काजोलसोबत स्वयंपाक करणे असो किंवा अनन्या पांडे किंवा विजय वर्मा सारख्या सेलिब्रिटींसोबत जेवण शेअर करणे असो, त्याने मन जिंकले.