सनी लिओनीने मुलगी निशाबद्दल काय स्वप्न रंगविले असेल? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:15 IST
काही दिवसांपूर्वीच दत्तक घेतलेली मुलगी निशाच्या करिअरविषयी सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर आतापासूनच गंभीर आहेत. काय स्वप्न रंगविले असेल या दाम्पत्याने? वाचा सविस्तर!
सनी लिओनीने मुलगी निशाबद्दल काय स्वप्न रंगविले असेल? जाणून घ्या!
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यातून एका चिमुकलीला दत्तक घेतले. निशा असे नाव ठेवलेल्या या चिमुकलीमुळे सनी आणि डेनियलचे आयुष्यच बदलून गेले असून, दोघेही आपल्या लाडक्या मुलीमुळे खूश आहेत. सध्या सनी आणि डेनियल निशाच्या अप-ब्रिंगिंगवर विशेष लक्ष देऊन आहेत. सनी म्हणतेय की, बेबी अडॉप्शन खूपच किचकट प्रोसेस आहे. वास्तविक ते असायलाच हवी. आम्हाला निशाला घरी आणण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागले. फायनली निशा घरी आली असून, आम्ही दोघेही त्यामुळे आनंदी आहोत. खरं तर आम्ही दोघेही स्वत:ला नशीबवान समजतो की, निशाने आमचा आई-वडील म्हणून स्वीकार केला आहे. स्टोरी पिकने दिलेल्या माहितीनुसार सनीने सांगितले की, ‘निशाला घरी आणण्यासाठी प्रचंड पेपर वर्क करावे लागले. आता निशा घरी आली असून, आमचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. निशा या जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे. आम्ही नशीबवान आहोत की, तिने आमची निवड केली. मी जेव्हा निशाला बघते तेव्हा ती मला एक प्रेमळ स्माइल देते. त्यानंतर सर्व काही ठीक होते. ती आमच्या आयुष्यातील प्रकाश आहे.’ मुलीच्या पालनपोषणाविषयी बोलताना सनी म्हणते की, ‘आम्ही एक परिवार म्हणून बराच वेळ एकत्र व्यतीत करीत असतो. त्याचबरोबर एकत्र कामही करीत असतो.’ पुढे बोलताना सनी सांगते की, ‘आम्ही सुरुवातीपासूनच एखादे मूल दत्तक घेण्याचा विचार करीत होतो. माझे हे स्वप्न तेव्हापासूनचे आहे, जेव्हा मी खूप यंग होते. योग्य पार्टनर मिळाल्याने नेहमीच आमचे ध्येय आणि मार्ग एक राहिला आहे. आमच्यात चांगला ताळमेळ असल्यानेच आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान, निशाविषयी सनी आणि डेनियलने खूप प्लॅन केले आहेत. याविषयी सनी सांगते की, ‘सध्या निशाच्या आयुष्यात नवा बदल होत आहे. सध्या आम्ही तिला एडजेस्ट करण्यासाठी मदत करीत आहोत. पुढे ती शाळेतही जाणार आहे. ती खूपच स्मार्ट आहे. डेनियल आणि मी तिला एक इंडिपेंडंट व्यक्ती बनवू इच्छितो. मग तिने भविष्यात एक अभिनेत्री म्हणून करिअर करावे किंवा एखादी डॉक्टर म्हणून तिने आयुष्यात पुढे जावे. तिचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि डेनियल पुरेपूर प्रयत्न करीत आहोत.