Join us

रणबीर कपूरसोबतच्या ‘त्या’ फोटोंवर काय म्हणाली माहिरा खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 14:11 IST

रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे कथित रिलेशनशिप मध्यंतरी चर्चेत आले होते. पण माहिरा मात्र यावर एक अक्षरही बोलली नव्हती. पण आता माहिरा बोललीय. ‘वरना’ या आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रकरणी माहिराने या प्रकरणावर तोंड उघडले.

रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे कथित रिलेशनशिप मध्यंतरी चर्चेत आले होते. या दोघांचे काही इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर   दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा भलतीच रंगली होती. या  फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते. आता हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ यानंतर जितका काय बोभाटा व्हायचा तो झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते.‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या. ट्रोलर्स  माहिराला असे आडव्या हातांना घेत असलेले पाहून रणबीरने या संपूर्ण प्रकरणावर खुलासाही केला होता.  मी गेल्या काही काळापासून  माहिराला ओळखतो. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे तिला ज्या पद्धतीने जज केले जात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे, असे रणबीरने  एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. पण माहिरा मात्र यावर एक अक्षरही बोलली नव्हती. पण आता माहिरा बोललीय. ‘वरना’ या आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रकरणी माहिराने या प्रकरणावर तोंड उघडले.  समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रणबीरसोबतच्या स्मोकिंग करतानाच्या फोटोंवर ती बोलली. ‘खरे तर या फोटोंवर बोलण्यासारखे काहीही नाही. मी सार्वजनिक आयुष्यात वागता-बोलतांना नेहमी काळजी घेते. लोकांनी माझे फोटो पाहिल्यानंतर मला अनेक प्रश्न केलेत. तू तुझ्या चित्रपटात असे काही (स्मोकिंग) करत नाही. मग रस्त्यांवर असे करण्याचा काय अर्थ? असे प्रश्न मला विचारले गेले. पण मी जगाला दाखवायला काही का करू? मी चित्रपटात काही गोष्टी करणार नाही. पण हे माझे खासगी आयुष्य आहे. एक मुलगा आणि एक मुलगी हँगआऊट करताना दिसणे, ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्यात काहीही वाईट नाही. हा पण या घटनेनंतर मी एक गोष्ट शिकलेय. ती म्हणजे मीडिया सर्वत्र आहे. त्यामुळे मी अधिक दक्ष झालीय,’ असे माहिरा या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतेय.एकंदर काय तर माहिराने हे माझे खासगी आयुष्य आहे, असे सांगून एकप्रकारे सगळ्यांची तोंड गप्प केली आहेत, इतकेच.ALSO READ: SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!!