-तर काय कमल हासनही झाला राजी? श्रुती हासन व मायकेल कोर्सेल करणार लग्न??
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:13 IST
कमल हासनची मुलगी श्रुती हासन हिचा बॉयफ्रेन्ड मायकेल कोर्सेल सध्या भारतात आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आम्ही तुम्हाला याबद्दलची ...
-तर काय कमल हासनही झाला राजी? श्रुती हासन व मायकेल कोर्सेल करणार लग्न??
कमल हासनची मुलगी श्रुती हासन हिचा बॉयफ्रेन्ड मायकेल कोर्सेल सध्या भारतात आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आम्ही तुम्हाला याबद्दलची बातमीही दिली होती. काल-परवाच श्रुती व तिचा बॉयफ्रेन्ड मायकेल दोघेही श्रुतीची आई सारिकासोबत दिसले होते. या तिघांचे फोटोही व्हायरल झाले होते. पण यानंतरचा श्रुती व मायकेलचा ताजा फोटो तुम्ही बघाल तर अवाक् व्हाल. होय, श्रुती व मायकेलचा हा फोटो आहे एका लग्न सोहळ्यातला. अलीकडे तामिळ अभिनेता आधव कन्नदासन आणि विनोधिनी सुरेश लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला श्रुती व मायकेल यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, श्रुतीचे पापा कमल हासन हेही यावेळी दिसले. या तिघांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत श्रुती लाल रंगाच्या साडीत आहे तर मायकेल पारंपरिक दाक्षिणात्य पोशाखात आहे. दोघांच्याही बाजूला कमल हासन बसलेला आहे. एकंदर काय तर, मायकेल व श्रुतीचे रिलेशनशिप सारिका व कमल दोघांनाही मान्य आहे, असेच या फोटोवरून दिसतेय. त्यामुळेच येत्या काळात श्रुती मायकेलसोबत लग्नबंधनात अडकली तर नवल वाटायला नकोय. ALSO READ : श्रुती हासनने आई सारिकाशी घालून दिली बॉयफ्रेन्ड मायकेल कोर्सेलची भेट! पाहा, फोटो!!श्रुती व मायकेल या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. श्रुती याठिकाणी एका ब्रिटीश रॉकबँडसोबत एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेली होती. पहिल्याच भेटीत श्रुती व मायकेल दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे दोघांचेही डेटिंग सुरु झाले. मायकेल हा एक ब्रिटीश आर्टिस्ट आहे. लंडनस्थित ‘डिप डायविंग’ या थिएटर ग्रूपशी तो जुळलेला आहे. मायकेलआधी साऊथचा अभिनेता सिद्धार्थसोबत श्रुतीचे अफेअर होते, असे म्हटले जाते. त्यानंतर श्रुती आणि सिद्धार्थ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्याही चर्चा होत्या. श्रुती व सिद्धार्थ लिव्ह इनमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच एका अनोळखी व्यक्तीसोबतचे श्रुतीचे फोटो व्हायरल झाले होते. ही अनोळखी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून मायकेल होती. मायकेलसोबतचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यावरून कमल हासन नाराज असल्याचे वृत्तही आले होते. पण आता कदाचित ही नाराजी मिटलीय.