सोशल मीडियावर हे काय करून बसले अमिताभ बच्चन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:47 IST
रात्री उशीरापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारे अमिताभ बच्चन आपल्या प्रत्येक चित्रपटाबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात. पण हे अपडेट्स शेअर ...
सोशल मीडियावर हे काय करून बसले अमिताभ बच्चन?
रात्री उशीरापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारे अमिताभ बच्चन आपल्या प्रत्येक चित्रपटाबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात. पण हे अपडेट्स शेअर करतानाच अमिताभ चुकले अन् निर्माते नाराज झाले. होय, ताजी खबर तरी हीच आहे. लवकरच अमिताभ बच्चन ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहेत. खरे तर या चित्रपटात त्यांची एक लहानशी भूमिका आहे. पण या तेलगू चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड उत्साहात आहेत. कारण हा त्यांचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. याच उत्साहाच्या भरात निर्मात्यांना न विचारता, अमिताभ यांनी या चित्रपटातील आपल्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि नेमके हेच निर्मात्यांना खटकले. चर्चा खरी मानाल तर बिग बींचे हे कृत्य ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’च्या निर्मात्यांना आवडले नाही. कारण या चित्रपटातील बिग बींची भूमिका, त्यांचे लूक लीक होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. ही माहिती चाहत्यांमध्ये गेलीचं तर ती अधिकृतपणे जावी, असे निर्मात्यांचे मत होते. पण अमिताभ यांनी निर्मात्यांना विश्वासात न घेताच, चित्रपटातील त्यांच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. ALSO READ : अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री केला ‘वेकअप कॉल’ अन् झोपेतून खाडकन जागी झाली टेलिकॉम कंपनी!!आता प्रश्न येतो की, अमिताभ स्वत: शूटींगमध्ये व्यस्त असताना व निर्मात्यांनी त्यांना सेटवरचे कुठलेही फोटो पुरवले नसताना त्यांनी ते कसे शेअर केलेत? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सलमान खानप्रमाणेच अमिताभ यांचाही पर्सनल फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर कायम त्यांच्यासोबत असतो. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’च्या सेटवरही अमिताभ यांचा पर्सनल फोटोग्राफर हजर होता. त्यानेच हे फोटो काढले आणि ते अमिताभ यांना दिले.‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटात अमिताभ व साऊथ सुपरस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. स्वातंत्र्य सैनिक यू नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात बिग बी कॅमिओ रोलमध्ये आहेत.