या व्हिडिओत नोरा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. नोरा फतेही याआधी सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन9’मध्ये स्पर्धक म्हणून दिसलीय. नोराच्या डान्सचे आधीच अनेक लोक दिवाने आहेत. अलीकडे नोरा पंजाबी सिंगर हार्डी संधूच्या ‘नाह’ गाण्यात दिसली होती. नोराने प्रभासच्या ‘बाहुबली’मध्येही आयटम सॉन्ग केले होते. याआधी नोरा जॉन अब्राहम स्टारर ‘रॉकी हँडसम’मधील रॉक द पार्टी या गाण्यात दिसली होती.
लवकरच नोरा फतेही ‘माय बर्थ डे सॉन्ग’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात नोरासोबत संजय सूरी दिसणार आहे. येत्या १९ तारखेला रिलीज होणारा हा चित्रपट समीर सोनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतो आहे.‘माय बर्थ डे सॉन्ग’ची कथा ४० वर्षीय विवाहित व्यक्तिची कथा आहे. ही व्यक्तिरेखा संजय सूरी साकारतो आहे. आज सलमान खाने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.