Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांसोबत आम्ही दिसतो ‘हॉट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 12:17 IST

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असतांनाच आलिया भट्टने पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले ...

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असतांनाच आलिया भट्टने पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिला सिद्धार्थसोबतच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणते,‘ आम्ही दोघे एकत्र खुपच हॉट दिसतो.आमची जोडी बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोडी असल्याचे मानले जातेय.’ आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा डेब्यू चित्रपट ‘स्टुडंट आॅफ द इयर’ पासूनच त्यांच्या प्रेमाला सुरूवात झाली आणि आता ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मुळे त्यांचे प्रेम आणखी बहरले. बरं, आलिया आता तूच हे कबूल करतेस की तुमची जोडी किती हॉट आहे ते!