आयफा 2017 साठी आम्ही सज्ज ! ‘बॉलिवूड’ न्यूयॉर्कला रवाना!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 11:56 IST
बॉलिवूडमध्ये सध्या ‘आयफा’चे वारे वाहातेय. न्यूयॉर्कमध्ये येत्या १३ जुलै ते १५ पर्यंत आयफा सोहळा रंगणार आहे. यंदा अभिनेता सैफ ...
आयफा 2017 साठी आम्ही सज्ज ! ‘बॉलिवूड’ न्यूयॉर्कला रवाना!!
बॉलिवूडमध्ये सध्या ‘आयफा’चे वारे वाहातेय. न्यूयॉर्कमध्ये येत्या १३ जुलै ते १५ पर्यंत आयफा सोहळा रंगणार आहे. यंदा अभिनेता सैफ अली खान आणि दिग्दर्शक करण जोहर हा सोहळा होस्ट करणार आहेत. तूर्तास सोहळ्याची लगबग सुरु झाली आहे आणि बॉलिवूड सेलिब्रिटी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. काल रात्री सैफ अली खान हा सारा व इब्राहिम या आपल्या दोन मुलांसोबत आयफासाठी रवाना झाला. सैफशिवाय करण जोहर, शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत, दिशा पटनी असे अनेक जण न्यूयॉर्कला रवाना झालेत. तत्पूर्वीचे मुंबई विमानतळावरचे या सर्वांचे फोटो कॅमेºयात कैद झालेत. सैफ, सारा व इब्राहिम अतिशय कूल अंदाजात विमानतळावर दिसले. अर्थात छोटी बेगम करिना कपूर यांच्यासोबत कुठेही दिसली नाही. शाहिद कपूर व मीरा यांच्यासोबत त्यांची लाडकी लेक मीशा ही सुद्धा दिसली. १५ जुलैला आयफा सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला आयफा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. यावेळी सलमान खान, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत, कृती सॅनन शानदार परफॉर्मन्स देणार आहे. वरूण धवनही आपल्या शानदार परफॉर्मन्ससह अवार्ड नाईटच्या एका भागाला होस्ट करताना दिसणार आहे. १४ जुलैला म्युझिकल ईव्हिनिंग आयआयएफए रॉक्सचे आयोजन होणार आहे. यात संगीतकार ए. आर.रहमान यांना इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन होणार आहे. एकंदर काय, तर आयफाची जय्यत तयारी झाली आहे. बॉलिवूडसोबतच सिनेप्रेमीही हा सोहळा अनुभवण्यास सज्ज आहे.