Watch Video : शाहिद कपूरने मीरा राजपूतला घातली लग्नाची पुन्हा मागणी; मात्र मीराने दिला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 19:41 IST
गेल्या मंगळवारी मुंबईत ‘हॉल आॅफ फेम अवॉडर््स नाइट’ची धूम बघावयास मिळाली. या अवॉर्ड नाइटमध्ये इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सोहळ्यात चार चॉँद लावले.
Watch Video : शाहिद कपूरने मीरा राजपूतला घातली लग्नाची पुन्हा मागणी; मात्र मीराने दिला नकार!
गेल्या मंगळवारी मुंबईत ‘हॉल आॅफ फेम अवॉडर््स नाइट’ची धूम बघावयास मिळाली. या अवॉर्ड नाइटमध्ये इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सोहळ्यात चार चॉँद लावले; मात्र सगळ्यांचेच लक्ष मोस्ट स्टायलिश कपल शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याकडे होते. सोहळ्यात या जोडप्यानेही तशाच अवतारात एंट्री करून उपस्थितांची मने जिंकलीत. दोघेही असे काही स्टायलिश दिसत होते की, रेड कार्पेटवरील त्यांचा अंदाज उपस्थितांना चांगलाच भावला. यावेळी शाहिद कपूरने ब्लॅक पॅण्ट, ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले होते. तर मीरा राजपूत हिने मोनिका जयसिंगने डिझाइन केलेला पीच रंगाचा सिल्क गाऊन परिधान केला होता. या पोशाखात दोघेही खूपच सुंदर दिसत होते. हॉल आॅफ फेम अवॉडर््समध्ये मीरा आणि शाहिद यांना मोस्ट स्टायलिश कपलचा अवॉर्ड दिला गेला. सध्या मीरा आणि शाहिदच्या अवॉर्ड्स नाइटचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, त्यामध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे. ज्यामध्ये शाहिद खाली बसत पत्नी मीराला प्रपोज करताना दिसत आहे. शाहिदचा हा प्रपोज करण्याचा अंदाज बघून मीरा हरखून तर गेली, परंतु तिने दिलेले उत्तर सर्वांनाच चकीत करणारे होते. तिने शाहिदला म्हटले की, ‘तुझ्या प्रपोजबाबत मला विचार करावा लागेल’. त्यानंतर शाहिदने मीराला, मी तुझ्याशी दुसºयांदा लग्न करायला तयार असल्याचे म्हटले. ज्यावर मीरा खूपच लाजत असल्याचे दिसत आहे. मीरा आणि शाहिदच्या फॅन्ससाठी हा व्हिडीओ खूपच मनोरंजक ठरत आहे. शाहिद सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लीड रोलमध्ये आहेत. चित्रपटात शाहिद पद्मावतीचा पती राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत आहे.