मान्यता ३८ वर्षांची झाली आहे. हा क्षण तिने तिच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय केला. मुलासोबत डान्स करताना तिने एकच धमाल केली आहे. दोघा मायलेकांचा डान्स खूपच क्युट आहे. मान्यताने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटोज् आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात चांगला बर्थ डे डान्स मी माझ्या मुलाबरोबर केला आहे.’
मान्यता आणि मुलगा शहरान लुइस फोंसीचे प्रसिद्ध गाणे डेस्पासितोवर ठेका धरत आहेत. याच व्हिडीओमध्ये मान्यता पती संजय दत्तबरोबरही डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. मान्यताने तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक सोलो फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
संजय दत्त कारागृहात शिक्षा भोगत असताना मान्यताने मोठ्या हिमतीने मुलांचा सांभाळ केला. यादरम्यान ती कधीही चर्चेत आली नाही. आता संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर आला याचा आनंद मान्यताच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत आहे. ती अधिकाधिक आपल्या फॅमिलीसोबत आनंदी क्षण एन्जॉय करताना दिसत आहे.