Watch video : छोट्या रणबीरसाठी आजोबा राज कपूर गात आहेत गाणं; व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 19:27 IST
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर आणि त्यांचा लाडका नातू रणबीर कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजोबा राज कपूर आपल्या चिमुकल्या नातवासाठी त्यांच्याच चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत.
Watch video : छोट्या रणबीरसाठी आजोबा राज कपूर गात आहेत गाणं; व्हिडीओ व्हायरल!
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर आणि त्यांचा लाडका नातू रणबीर कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजोबा राज कपूर आपल्या चिमुकल्या नातवासाठी त्यांच्याच चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये या दोघां व्यतिरिक्त काका रणधीर कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी दिसत आहेत. सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धूम उडवून दिली असून, नातवांबद्दल राज कपूर यांचे असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. वास्तविक हा व्हिडीओ बॉलिवूड अभिनेता अली फजल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये दिवंगत अभिनेते राज कपूर नातू रणबीर आणि रिद्धिमाला त्यांच्याच चित्रपटातील प्रसिद्ध ‘आवारा हूं, आवारा हूं’ हे गीत ऐकवित आहेत. राज कपूर यांचे दोन्ही नातू त्यांच्याजवळ बसलेले असून, गाणं म्हणताना ते त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवित आहेत. त्याचबरोबर त्यांना लाडाने जवळ घेतानाही दिसून येत आहेत. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात बघितला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर लहानपणी खूपच गोंडस असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे यामध्ये रणबीर कपूर याचा निरागसपणा होय. जेव्हा आजोबा राज कपूर गाण म्हणत असतात, तेव्हा रणबीर त्यांच्याकडे अतिशय निरागसपणे बघत असतो. रिद्धिमादेखील आपल्या आजोबांच्या चेहºयावरील हावभाव न्याहाळत असते. त्यामुळे कपूर फॅमिलीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच भावत आहे. दरम्यान, रणबीर सध्या त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर तो ‘दत्त’ या बायोपिकमधील काही भाग शूट करण्यासाठी न्यू यॉर्कला जाणार आहे. याठिकाणी तो ‘आयफा’मध्येदेखील सहभागी होणार आहे. रणबीरचा ‘जग्गा जासूस’ १४ जुलै रोजी रिलीज होणार आहे.