Join us

Watch Video : ‘इब्राहिम... इब्राहिम म्हणत सैफच्या मुलाला आवाज देत होती मलायका अरोरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 17:10 IST

मलायका जेव्हा पार्टीत आली, तेव्हा सगळयांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर हे दोघे विभक्त होतील अशी चर्चा रंगत होती, परंतु तसे घडले नाही

अभिनेता अरबाज खान याच्या व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीची चर्चा अजूनही रंगत आहे. कारण या पार्टीत एवढ्या कलाकारांनी आणि स्टारकिड्सनी हजेरी लावली होती की, प्रत्येकाविषयी कुठली ना कुठली बातमी समोर येत आहे. अरबाजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याची एक्स पत्नी मलायका अरोरा हीदेखील पार्टीत हजर होती. पार्टीत बरेच गॉसिप आणि धमाल झाल्याची माहिती समोर आली, परंतु पार्टीमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे अनेकांचे लक्ष मलायका अरोरा हिच्याकडे वळले. होय, मलायका जेव्हा पार्टीत आली, तेव्हा सगळयांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर हे दोघे विभक्त होतील अशी चर्चा रंगत होती, परंतु तसे घडले नाही. उलट मलायका अरबाजच्या अधिकच क्लोज येत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. असो, या पार्टीत सैफ अली खानचा मुलगा छोटा नवाब इब्राहिम खान हादेखील उपस्थित होता. पार्टी संपल्यानंतर इब्राहिम त्याच्या मित्रांसोबत बाहेर पडत होता. तेव्हा मलायकाही त्याच्या मागे  येत होती. इब्राहिम मित्राच्या खाद्यांवर हात ठेवून गप्पा मारण्यात दंग होता. परंतु मलायकाचे सर्व लक्ष त्याच्याकडेच होते. जेव्हा तो पुढे गेला तेव्हा मलायका जोर-जोरात ‘इब्राहिम... इब्राहिम... म्हणत त्याला हाका मारत होती. मलायकाचा आवाज उपस्थितांना ऐकावयास मिळाल्याने सगळेच तिच्याकडे बघत होते.  गेल्या काही दिवसांपासून सैफच्या या छोट्या नवाबाबद्दल बºयाच चर्चा रंगत आहेत. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे माध्यमांच्या नजरा नेहमीच त्याच्यावर असतात. याच काळजीपोटी मलायका त्याला बोलावत असावी. माध्यम प्रतिनिधींचा त्याला त्रास होऊ नये म्हणून मलायकाने मोठमोठ्याने त्याला आवाज देत आपल्या गाडीत बसण्यास सांगितले. इब्राहिमला छायाचित्रकारांचा कसा सामना करावा याबाबतची अद्यापपर्यंत सवय नसल्यानेच मलायकाने त्याला बोलविले असल्याचे समजते. दरम्यान, पार्टीत करिना आणि सैफ दोघेही नसल्यामुळेच मलायका इब्राहिमची काळजी घेत होती. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून, त्यामध्ये मलायका इब्राहिमला आवाज देताना दिसत आहे. खरं तर आतापर्यंत इब्राहिम बहीण सारा अली खान हिच्यासोबत बºयाचदा स्पॉट झाला आहे; मात्र पार्टीत एकट्याने तो कदाचित पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेला असेल. ही बाब मलायका चांगली जाणून असल्यानेच तिने त्याला हाक मारली असावी.