Join us

Watch Video : मामा सलमान खान अन् भाचा आहिल यांची फाइट तुम्ही बघितली काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 14:29 IST

सलमानची बहीण अर्पिता हिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सलमान भाचा आहिलबरोबर खेळताना दिसत आहे. या व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे सलमान भाचा आहिलबरोबर फायटिंग गेम खेळताना दिसत आहे

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याला अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखले जाते. बºयाच चित्रपटांमध्ये आपण त्याची तुफान अ‍ॅक्शन बघितली आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला सलमानची क्यूट फाइट दाखविणार आहोत. ‘क्युट फाइट’ हा शब्द कदाचित तुम्हाला बुचकळ्यात टाकू शकतो, परंतु तुम्ही व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हालाही सलमानची ही क्यूट फाइट प्रेमात पाडेल. सध्या त्याच्या या फाइटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान त्याचा चिमुकला भाचा आहिलबरोबर फाइट करताना दिसत आहे. सलमानची बहीण अर्पिता हिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सलमान भाचा आहिलबरोबर खेळताना दिसत आहे. या व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे सलमान भाचा आहिलबरोबर फायटिंग गेम खेळताना दिसत आहे. तसेच सलमान यावेळी त्याच्या ‘सुलतान’ या चित्रपटाचे टायटल सॉन्गही गाताना दिसत आहे. खरं तर आहिल नेहमीच मामा सलमानची कंपनी खूप एन्जॉय करतो. सलमानलादेखील आहिलबरोबर वेळ घालवायला आवडते. हे दोघे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा वय विसरून एकमेकांमध्ये रमून जातात. सलमान तर आहिलबरोबर खूप एन्जॉय करतो.  या अगोदरदेखील सलमान आणि आहिलचे बरेचसे व्हिडीओ समोर आलेले आहेत. हे सर्वच व्हिडीओ सलमानच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केले आहेत. सध्या आहिल मोठा होत असून, प्रचंड खोडकर असल्याचे दिसून येत आहे. सलमानच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, सध्या तो त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्याच्यासोबत एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहे. नुकतेच हे दोघे मोरक्को येथून शूटिंग पूर्ण करून परतले आहेत.