Join us

Watch Video : खिलाडी अक्षयकुमारला ‘बॉक्सिंग’मध्ये चक्क डॉगींनी दिली टसन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 22:50 IST

​आपल्याला माहीत आहे की, चित्रपटांमध्ये अक्षयकुमार डमीचा आधार न घेता स्वत:च स्टंट करतो. अक्षय एक मार्शल आर्ट मॅन असल्याने त्याचे स्टंट अंगावर शहारे आणणारे असतात.

आपल्याला माहीत आहे की, चित्रपटांमध्ये अक्षयकुमार डमीचा आधार न घेता स्वत:च स्टंट करतो. अक्षय एक मार्शल आर्ट मॅन असल्याने त्याचे स्टंट अंगावर शहारे आणणारे असतात. त्यामुळेच त्याला ‘बॉलिवूडचा खिलाडी’ असे म्हटलं जातं. मात्र अक्षय केवळ गुंडांसोबतच फाइट खेळतो असे नाही तर, आपल्या पाळीव डॉगीसोबत त्याचे बॉक्सिंगचे डाव चांगलेच रंगत असतात. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. आज तुम्हाला असा व्हिडिओ दाखविणार आहोत, जो बघून तुम्ही हैराण व्हाल. कारण या व्हिडिओमध्ये तो चक्क आपल्या पाळीव डॉगीच्या पिल्लांबरोबर दोन हाथ करत आहेत. आता अक्षयचे पाळीव डॉगी म्हटल्यानंतर तेही अक्षयला टक्कर देणारे असतीलच असा जर विचार केला तर चुकीचा ठरू नये. पण या विचारातही काहिसे तथ्य आहे, कारण या डॉगी त्याच्यावर असे काही तुटून पळतात की, अक्षय आता माघार घेतो की काय? असे क्षणभर वाटते.   http://{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/akshaykumarofficial/videos/10154789600983283/">अर्थात आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत, तो अक्षयने त्याच्या पाळीव डॉगीबरोबर काढलेला एक फनी व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताच नेटिझन्सला हा व्हिडिओ एवढा भावला की काही मिनिटांतच एक हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्यास शेअर केले. शिवाय लाइक्स आणि कमेण्ट्सही हजारांच्या संख्येत आहेत. सध्या अक्षय त्याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, फावल्यावेळेत तो अशाप्रकारे आपल्या पाळीव प्राण्यांनाही जवळ करत असल्याचे दिसून येत आहे. याव्यतिरिक्त अक्षय तापसी पन्नू हिच्याबरोबर ‘नाम शबाना’मध्येही बघावयास मिळणार असून, हा चित्रपट ‘बेबी’च्या टीमबरोबर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘बेबी’चा सीक्वल असल्याचेही बोलले जात आहे. या चित्रपटासाठी अक्षयने तापसीला मार्शल आर्टचे ट्रेनिंग दिले आहे.