Join us

Watch : शब्द वापरा; पण जरा जपून! सनी लिओनीने राम गोपाल वर्मांना सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 10:12 IST

राम गोपाल वर्मा यांनी जागतिक महिला दिनी केलेल्या tweetsवरून रान पेटले असताना, आता अभिनेत्री सनी लिओनी हिने या वादात उडी घेतली आहे. twitterवर एक व्हिडिओ संदेश जारी करून तिने राम गोपाल वर्मांना अगदी नेमक्या शब्दांत ‘सुनावले’ आहे.

राम गोपाल वर्मा यांनी जागतिक महिला दिनी केलेल्या tweetsवरून रान पेटले असताना, आता अभिनेत्री सनी लिओनी हिने या वादात उडी घेतली आहे. twitterवर एक व्हिडिओ संदेश जारी करून तिने राम गोपाल वर्मांना अगदी नेमक्या शब्दांत ‘सुनावले’ आहे.  सनी जे बोलली ते इथे महत्त्वपूर्ण आहे कारण राम गोपाल यांनीच स्वत:सोबत सनीला या वादात खेचले होते.  प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा, असे वादग्रस्तtweet रामूने केले होते. त्यांच्या नेमक्या याच tweetवरून सध्या रान माजले आहे. रामूंच्या या tweetने सनी सुद्धा भडकली आहे. अर्थात आपला हा संताप तिने अगदी संयमी शब्दांत व्यक्त केला आहे. बदल केवळ तेव्हाच घडू शकतो, जेव्हा आपल्याजवळ एक आवाज असतो. तर मग चला, काळजीपूर्वी शब्दांची निवड करा. शांती आणि प्रेम!! असा संदेश तिने दिला आहे. तिचा हा संदेश राम गोपाल वर्मांसाठी आहे, हे नक्कीच. एकप्रकारे सनीने राम गोपाल वर्मां यांनाच बोलताना तोल सुटू देऊ नका, शब्दांचा वापर करताना भानावर असा, असे सुनावले आहे.}}}} महिला दिनी एकापाठोपाठ एक असे अनेक आक्षेपार्ह tweetsकेले होते. त्यांच्या या tweetsवर सर्व स्तरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हिंदू ग्रूप हिंद जागृती या महिला शाखेच्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी याप्रकरणी थेट राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गोवा पोलिसात तक्रार दाखल केली. वर्मा यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.महिला कायद्याअंतर्गत स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे महिलांचा अपमान करणाºया राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. राम गोपाल वर्मांचे twitter अकाउंट नेहमीसाठी बंद केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.