Join us

watch : ​पती डेनिअलसोबत सनी लिओनीची धम्माल मस्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 10:29 IST

बॉलिवूडची ग्लॅमडॉल सनी लिओनी पती डेनियल वेबर सध्या मॅक्सिको येथे हॉली डे एन्जॉय करत आहेत. मॅक्सिकोच्या बिचवर दोघे पती-पत्नी धम्माल मज्जा करत आहेत.

बॉलिवूडची ग्लॅमडॉल सनी लिओनी काल परवा तुम्हाला बेधूंद होताना दिसली. एनर्जी ड्रिंकचे एक टीन पोटात रिचवल्यानंतर तिने पती डेनियल वेबर याला चांगलेच वैतागून सोडले होते. पण आता कदाचित एनर्जी ड्रिंकची असर उतरलाय. होय, सनी आणि डेनिअल सध्या मॅक्सिको येथे हॉली डे एन्जॉय करत आहेत.मॅक्सिकोच्या बिचवर दोघे पती-पत्नी धम्माल मज्जा करत आहेत. होय, डेनियलने या मस्तीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल सनी लिओनी काळ्या रंगाच्या बिकनीत दिसतेय. कधी डेनिअलच्या खांद्यावर ती बसलीय तर कधी त्याच्या पाठीवर स्वार होऊन मस्तपैकी बिचवर हुंदडतेय. एकंदर काय तर सनी व डेनिअल एकमद मेड फॉर इच अदर कपल दिसताहेत. खुद्द सनीने बिकनीतील एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तुम्ही सनीचे हे हॉट फोटो आणि तिचा तेवढाच हॉट व्हिडिओ बघायलाच हवा. तेव्हा बघात तर...सनीप्रमाणेच सनीचा पती डेनियल वेबर हा सुद्धा अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत स्टार राहुन चुकला आहे. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. यानंतर दोघांनीही पॉर्न इंडस्ट्रीला राम राम ठोकला. सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तर डेनियल तिचा बिझनेस मॅनेजर बनला. त्यामुळेच सनी बॉलिवूडमधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पती डेनियलला देते. डेनियलच्या परवानगीशिवाय सनी कुठलाही चित्रपट साईन करत नाही.ALSO READ :see pics: ​एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर बेभान झाली सनी लिओनी !सनी व डेनियल सर्वप्रथम लॉस वेगासच्या एका रेस्टारंटमध्ये भेटले. डेनियल तिथे आपल्या बँडसोबत शो करण्यासाठी आला होता तर सनी आपल्या मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी तिथे पोहोचली होती. सनीला पाहताच डेनियल तिच्या प्रेमात पडला. सनी रेस्टारंटमध्ये बसली होती. मग काय, डेनियल तिच्या टेबलापाशी गेला आणि तिचे नाव विचारून परतला. यानंतर सनी त्या रेस्टारंटमध्ये पोहोचली की, एक फुलांचा गुच्छ तिला मिळायचा. अर्थातच हा पुष्पगुच्छ डेनियलने पाठवलेला असायचा. अशी दोघांची प्रेमकथा बहरली आणि पुढे डेनियल व सनीने लग्नाचा निर्णय घेतला.