Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : संजय दत्तच्या आगामी 'तोडबाज'चा अफलातून ट्रेलर रिलीज, धमाकेदार आहे 'बाबा'चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 15:01 IST

'तोडबाज'ची कथा अफगाणिस्तान युद्धात रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांची आहे. यांच्यात एक व्यक्ती पोहोचते ज्याने स्वत: आप्तांना दहशतवादी हल्ल्यात गमावलं आहे.

गेल्या काही दिवसांत अभिनेता संजय दत्त आपल्या सिनेमांऐवजी लंग कॅन्सरमुळे अधिक चर्चेत होता. आता संजय दत्त उपचारानंतर घरी परतला आहे. आजारावर तो वेगाने मार करत आहे. सोबतच त्याच्या आगामी सिनेमांची उत्सुकताही त्याच्या फॅन्सना लागली आहे. अशात त्याच्या 'तोडबाज' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. संजय दत्तची एक वेगळी आणि दमदार भूमिका तुम्हाला यात बघायला मिळेल.

'तोडबाज'ची कथा अफगाणिस्तान युद्धात रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांची आहे. यांच्यात एक व्यक्ती पोहोचते ज्याने स्वत: आप्तांना दहशतवादी हल्ल्यात गमावलं आहे. ही व्यक्ती आर्मीतील माजी डॉक्टर आहे आणि या मुलांना तो बंदुकीऐवजी हाती बॅट-बॉल देतो. अडचण ही आहे की, या परिसरातील दहशतवाद्यांना या मुलांना सुसाइड बॉम्बर बनवायचं असतं. पण संजय दत्तची भूमिका असं होऊ देत नाही. 

'तोडबाज' सिनेमात संजय दत्तसोबतच नर्गिस फाखरी आणि राहुल देव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश मलिकने केलं आहे. पुढील महिन्यात हा सिनेमा ११ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

टॅग्स :संजय दत्तनेटफ्लिक्स