Join us

Watch Phillauri Trailer : ​अशी अनुष्का शर्मा तुम्ही कधीच पाहिली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 12:36 IST

अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली. अनुष्काने स्वत:च्या twitter अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज केला.

अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली. अनुष्काने स्वत:च्या twitter अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज केला.  ‘फिल्लोरी’मध्ये अनुष्का शर्मा एका नव्या अंदाजात दिसते आहे. अशा भूमिकेत अनुष्काला पाहण्याची अपेक्षाही तुम्ही कधी नसेल, अशा हटके अंदाजात ती यात दिसते आहे.होय, ट्रेलरमध्ये अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे. तिला सर्वत्र केवळ तिचा हिरो दिसतोय.  अभिनेता सूरज शर्मा याआधी ‘लाईफ आॅफ पाय’मध्ये दिसला आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते, असे या ट्रेलरमध्ये दिसतेय. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते. समाजात पसरलेली अंधश्रद्धा दूर करण्याच्या इराद्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. त्याच इराद्याने या चित्रपटातील अनुष्काचा फर्स्ट लूक तयार करण्यात आला आहे.‘फिल्लोरी’ हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. यात अनुष्कासोबत सूरज शर्मा शिवाय दिलजीत दोसांज आणि मेहरीन कौर मुख्य भूमिकेत आहेत. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली होती. आता अनुष्काचा हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे, तेव्हा तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.