Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीच्या लेकीनं जिंकली नेटक-यांची मनं, पाहा नेमकं तिने काय केले, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 16:58 IST

जुलै 2017 मध्ये सनी आणि तिचे पती डेनियल यांनी 21 महिन्यांच्या निशाला महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले होते. तिचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं.

सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या मुलांचे फोटो व्हायरल होणं काही नवीन गोष्ट नाही. वारंवार त्यांचे फोटो तसे व्हायरल होतात. मात्र सध्या ज्या स्टारकिड्चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो नक्कीच खास आहे. होय, सनी लिओनीची मुलगी निशाचा हा व्हिडीओ आहे. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ आहे. सनी लिओनीचा पती डॅनिअलसोबत निशा आणि तिचे दोन लहान भाऊ स्पॉट झाले होते. डॅनिअलला दोन्ही मुलांना सांभाळणे कठिण जात होते.

गाडीतून उतरल्यावर एका मुलाचा हात त्याच्याकडून सुटतो. तो पुढे जात असल्याचे बघताच निशा त्याच्या लहाना भावाचा हात पकडते आणि त्याला सांभाळताना दिसते. सध्या निशाचा भावांबद्दलचे प्रेम पाहून सारेच तिचे कौतुक करत आहेत. निशा ही फक्त ५ वर्षाची आहे. इतक्या लहान वयातही तिच्यातही समज असल्याचे पाहून तिचा प्रेमळ स्वभावाने सा-यांची मनं आज निशाने जिंकली आहेत. निशामुळे पुन्हा एकदा सनी आणि डॅनिअल दोघांनी मुलांना खूपच चांगले संगोपण करत असताना त्यांना चांगले संस्कारही देत आहेत. त्यामुळे सनी आणि डॅनिअल या दोघांचेही खूप कौतुक नेटीझन्स करत आहेत.

मध्यंतरी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. सनी लिओनी ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला 13’च्या शूटींगसाठी केरळमध्ये होती.  मुंबईला परतली तेव्हा डॅनिअल सनी आणि मुलांना घ्यायला एअरपोर्टवर आला होता. सनी मुलांसह एअरपोर्टच्या बाहेर आली आणि डेनिअलला पाहून मुलं अक्षरश: आनंदाने बेभान झाली. चिमुकली निशा तर पापाला पाहून लगेच त्याच्याकडे धावली आणि तिने डॅनिअलला घट्ट मिठी मारली.

 जुलै 2017 मध्ये सनी आणि तिचे पती डेनियल यांनी 21 महिन्यांच्या निशाला महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले होते. तिचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं.निशाला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला २ वर्ष वेळ लागला आणि तेव्हापासून सनी आणि डॅनिअल चांगले आई-वडील होण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सनीने सांगितलं की, तिचं आमच्या जीवनात येणं आनंददायी आहे. सनीला तिच्या मुलीपासून काहीही लपवायचं नाहीये. योग्य वेळ आल्यावर तिचे खरे आई - वडिल कोण आहेत याविषयी सगळी माहिती तिला देण्यात येईल असेही सांगितले होते.

टॅग्स :सनी लिओनी