Watch Full Movie. ..वादानंतर प्रत्युषा बॅनर्जीचा अखेरचा चित्रपट रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 18:47 IST
बराच काळ सुरू असलेल्या वादानंतर टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा लघुपट अखेर आज (१ एप्रिल) रिलीज करण्यात आला आहे.
Watch Full Movie. ..वादानंतर प्रत्युषा बॅनर्जीचा अखेरचा चित्रपट रिलीज!
बराच काळ सुरू असलेल्या वादानंतर टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा लघुपट अखेर आज (१ एप्रिल) रिलीज करण्यात आला आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंग याने मुंबई पोलिसात काम्या पंजाबी हिच्या विरोधात तक्रार दाखल करीत चित्रपटावर आक्षेप घेतला होता. ज्यामुळे न्यायालयाने एक दिवसासाठी या चित्रपटाच्या रिलीजवर बंंदी आणली होती. आता सर्व वाद संपुष्टात आले असून, काम्याने हा चित्रपट रिलीज केला आहे. मुंबई येथील कंट्री क्लबमध्ये आज सायंकाळी ४ वाजता हा चित्रपट रिलीज केला गेला. याबाबत काम्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, जेव्हा लोक हा चित्रपट बघतील तेव्हा त्यांना प्रत्युषाच्या भावना आणि तिचा त्रास लक्षात येईल. शिवाय ती कुठल्या त्रासातून त्याकाळात वाटचाल करीत होती, याचाही अंदाज त्यांना बांधता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज याने अनेक आरोप करीत चित्रपटाच्या रिलीजविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. ज्यावर न्यायालयाने सुनावणी देताना एक रिलीजवर एक दिवसाची बंदी आणली होती. मात्र या सुनवाईदरम्यान काम्या किंवा चित्रपटाशी संबंधित एकही सदस्य उपस्थित नव्हता. केवळ राहुलच न्यायालयात उपस्थित होता. यावेळी राहुलने मानहाणीचा दावा करताना एक कोटी रुपयांची मागणीदेखील केली होती. दरम्यान रिलीज झालेल्या प्रत्युषाच्या या अखेरच्या लघुपटाचे नाव ‘हम कुछ न कह सके’ असे आहे. हा चित्रपट प्रत्युषाने आत्महत्त्या करण्याच्या दीड महिना अगोदरच शूट केला होता. या चित्रपटात इमोशनल सिन्ससाठी प्रत्युषाने ग्लिसरीनचा अजिबात आधार घेतला नव्हता. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून, तिच्या वास्तविक जीवनाची झलकही यामध्ये बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट डिप्रेशन आणि प्रेमात धोका यावर आधारित आहे. प्रत्युषाची अतिशय क्लोज मैत्रीण असलेल्या काम्याने धाडस करीत हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचविला आहे. आता यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात, हे बघणे मजेशीर ठरणार आहे.