Join us

'वॉर २'च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट कियाराचा बिकिनी अवतार, हृतिक-Jr NTR सोडून अभिनेत्रीवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:07 IST

ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अॅक्शनचा थरार असलेल्या टीझरमध्ये कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेला 'वॉर २' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'वॉर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अॅक्शनचा थरार असलेल्या टीझरमध्ये कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'वॉर २'मध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये अभिनेत्रीची एक झलक दिसत आहे. यामध्ये कियाराचा बिकिनी अवतार पाहायला मिळत आहे. कियाराने पहिल्यांदाच ऑनस्क्रिन बिकिनीमध्ये सीन शूट केले आहेत. तिचा बिकिनीतील बोल्ड लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 'वॉर २'च्या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर नव्हे तर कियाराच्या बिकिनी लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

कियाराचा बिकिनी लूक पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "बिकिनी क्वीन", "ही तर गरोदर आहे मग हे शूट कधी केलं?", "सिद्धार्थ मल्होत्राला जलसी होत असेल", "हे बघून सिद्धार्थचं काय होईल?", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, 'वॉर २' मध्ये ऋतिक आणि ज्युनिअर एनटीआर यांची टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्यानं चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेमात हृतिक रोशन रॉ एजेंटच्या भूमिकेत आहे. तर ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनकियारा अडवाणीज्युनिअर एनटीआर