अनुष्का शर्मासोबत व्हिडिओ कॉलिंग करायचेय? हा घ्या नंबर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:58 IST
अनुष्का शर्माचा फोन नंबर तुम्हाला मिळाला तर? काय, उडालातं? पण आता हे शक्य आहे. अनुष्कासोबत व्हॉट्स अॅपवर कनेक्ट व्हायची ...
अनुष्का शर्मासोबत व्हिडिओ कॉलिंग करायचेय? हा घ्या नंबर!!
अनुष्का शर्माचा फोन नंबर तुम्हाला मिळाला तर? काय, उडालातं? पण आता हे शक्य आहे. अनुष्कासोबत व्हॉट्स अॅपवर कनेक्ट व्हायची तुमची इच्छाही पूर्ण होऊ शकणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. अनुष्काने आपल्या चाहत्यांसाठी एक फोन नंबर जारी केला आहे. हा नंबर तुम्हाला अनुष्काच्या वाट्स अॅपशी कनेक्ट करू श्कतो. मग काय, एकदा नंबर कनेक्ट की, अनुष्कासोबत बोलायला करायला तुम्ही एकदम मोकळे. आता हा नंबर मिळवायची घाई तुुम्हाला झाली असेल तर हा नंबर आहे, 9867473178. या नंबरवर अनुष्का तिच्या चाहत्यांसोबत व्हिडिओ कॉलिंग फिचरच्या माध्यमातून संपर्कात राहील.या क्रमांकाला शशी नावाने रजिस्टर केले गेले आहे. कारण अनुष्काच्या आगामी चित्रपटात म्हणजेच ‘फिल्लोरी’मध्ये ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव शशी आहे. अर्थातच ‘फिल्लोरी’च्या प्रचार अभियानादरम्यान अनुष्काचा हा क्रमांक युज होणार आहे. यानंतर कदाचित हा नंबर बंद आणि अनुष्काही आऊट आॅफ रेंज होऊ शकते. त्यामुळे अनुष्कासोबत बोलायचे तर तुमच्याकडे अगदी लिमिटेड टाईम आहे, असेच समजा, अन् लागा कामाला...!ALSO READ : अनुष्का शर्माच्या ‘फिल्लोरी’चे तिसरे पोस्टर आले!So Romantic !! अखेर विराट कोहलीने दिली अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली!क्लिन स्लेट फिल्म आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या चित्रपटात अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे. सूरज शर्मा हा सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते,असे या चित्रपटाचे कथानक आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे.अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली होती.