Join us

​वलूश डिसूजा का केले वजन कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 22:04 IST

अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणारी वलूशा डिसूजा आगामी प्रोजेक्टमध्ये हिमेश रेशमीयासोबत दिसणार आहे. याबाबतची माहिती ...

अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणारी वलूशा डिसूजा आगामी प्रोजेक्टमध्ये हिमेश रेशमीयासोबत दिसणार आहे. याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या एका अल्बमच्या निमित्ताने शेअर केली होती. आता बातमी ही आहे की, यात वलूशाचा नवा लूक पहायला मिळणार आहे. मागील वर्षी फॅ न या चित्रपटात वलूशाने शाहरुख खानच्या पत्नीची भूमिका साकरली होती. गेली अनेक वर्र्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या वलूशासाठी फॅन नवसंजिवनी ठरला होता. आता ती हिमेश रेशमियासोबतच्या ‘ट्रिपी’ ट्रेकमध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील एका गाण्यासाठी वलूशाने आपले वजन कमी केले आहे. हिमेश रेशमियाच्या या अल्बमचे नाव ‘आप की मौसिकी’ असे असून यासाठी वलूशा डिसूजा चांगलीच मेहनत करीत आहे. विशेष म्हणजे यासाठी तिने चांगलेच डायट फॉलो केले आहे. आता तिच्या या मेहनतीला व हिमेश रेशमियाच्या संगीताला कसा रिस्पॉन्स देतात हे तर अल्बम रिलीज झाल्यावरच कळेल. सध्या बॉलिवूडमध्ये सिंगल गाण्याचे चलन आले आहे हे विशेष. Read More : जगातील साºया संधी आत्मसात करायच्यातदरम्यान, टी सीरीजने केलेले प्रयोग चांगलेच यशस्वी ठरले आहेत, यात मालिकेत पुढचा प्रयत्न हिमेश रेशमिया याचा हा अल्बम असणार आहे. त्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होते हे कळेलच. याचसाठी वलूचाने तयारी केली आहे. गेली दीड दशक ापासून मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करणारी  वलुशा डिझुझाने वैशाली सामंतच्या विंचू चावला या गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मात्र के वळ १९ व्या वर्षी लग्न केल्याने वलूशाने बॉलिवूडमधून अल्पविराम घेतला होता. फॅन हा तिचा पुनरागमनाचा चित्रपट ठरला होता. ALSO READ ​‘काबिल’चा खलनायक कधी काळी होता हृतिकचा बॉडीगार्डशाहरुख खान म्हणाला, माझे वय आता रोमँटिक चित्रपटासाठी नाही!