Join us

विनोद मेहरा यांची मुलगी सोनियाने कबुल केली साखरपुड्याची गोष्ट, होणाऱ्या नवऱ्याबाबत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:29 IST

काही दिवसांपूर्वी दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

गेल्या आठवड्यात अशी बातमी आली होती की दिवंगत विनोद मेहरा यांची मुलगी सोनियाने बॉलिवूडला बाय बाय म्हटले आहे. सध्या दुबईत राहणारी सोनियाने हे वृत्त चुकीचं असल्याचे सांगितलं. सोनिया म्हणाली, मी आता बॉलिवूडचा भाग नाही असा निर्णय कोणी घेतला आणि ही बातमी कोणी पसरवली हे मला माहित नाही, परंतु ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

ई-टाईम्सशी बोलताना सोनिया म्हणाली की, मी दुबईला शिफ्ट झाली आहे, कारण ते लंडन, भारत आणि केनियाच्यामध्ये आहे. मी बर्‍याचदा लंडन आणि केनियाला जाते. तिकडे माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. 2007 मध्ये  'व्हिक्टोरिया नंबर 2003' पासून करिअरची सुरुवात करणारी सोनिया म्हणाली,  मला जे काही मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे आणि मला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास देखील रस आहे. मी कोणत्याही भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करेन आणि याबद्दल मी काही दिग्दर्शकांशी बोलत आहे. स्टार म्हणून नव्हे तर कलाकार म्हणून काम केल्याचा मला आनंद आहे.

सोनियाने तिच्या साखरपुड्याबाबत सांगितले की, हो माझा साखरपुडा झाला आहे, पण मी इंडस्ट्री सोडलेली नाही. त्याने आपला होणार कुणालबद्दल सांगितले, जे फोटो  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोनिया म्हणाली की, आम्ही गेली 7 वर्षे एकत्र आहोत आणि जवळपास एक वर्षापूर्वी आमचा साखरपुडा झाला आहे. पण अजून लग्न बंधनात अडकलेलो नाही. कुणालबद्दल बोलताना सोनिया म्हणाली की तो मुंबईचा आहे, पण दुबईमध्ये 13 वर्षांपासून राहतो आहे.

टॅग्स :विनोद मेहरा