Join us

​- तर म्हणून वजन घटवणार विवेक ओबेरॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 19:33 IST

चित्रपटांतील भूमिकांसाठी वजन वाढवणे, घटवणे हे सध्या बॉलिवूडमध्ये कॉमन झालेय. आमीर खानने ‘दंगल’साठी वजन वाढवले मग घटवले. रणदीप हुड्डाने ...

चित्रपटांतील भूमिकांसाठी वजन वाढवणे, घटवणे हे सध्या बॉलिवूडमध्ये कॉमन झालेय. आमीर खानने ‘दंगल’साठी वजन वाढवले मग घटवले. रणदीप हुड्डाने ‘सरबजित’साठी वजन कमी केले. आता अभिनेता विवेक ओबेरॉय हा सुद्धा त्याच्या आगामी चित्रपटासाठी वजन कमी करणार आहे. होय, राम गोपाल वर्मांच्या ‘राय’मध्ये विवेक अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘राय’मधील काही दृश्यांसाठी विवेकला १८ किलो वजन कमी करायचे आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांसाठी विवेक यंग अवतारात दिसणार आहे आणि त्याचसाठी त्याला वजन कमी करायचे आहे. विवेकने याची तयारीही सुरु केली आहे. जवळपास महिनाभरापासून विवेक केवळ लिक्विड डाएटवर आहे. विवेकच्या आहार तज्ज्ञाने त्याला ट्रेनिंग सुरु होण्यापूर्वी खूप सारे कोमट पाणी, ज्यूस व हर्बल लिक्विड प्यायला सांगितले आहे.