Join us

करिना कपूरसोबत पुन्हा एकदा काम करण्याची विशाल भारद्वाजची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 16:28 IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा बहुचर्चित ‘रंगून’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता लागली असतानाच विशाल ...

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा बहुचर्चित ‘रंगून’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता लागली असतानाच विशाल भारद्वाज याने करिना  क पूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशालने याआधी करिना कपूरसोबत ‘ओमकारा’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात करिनासोबत सैफ अली खान व अजय देवगन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आगामी ‘रंगून’या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्यावेळी मीडियाशी बोलताना दिग्दर्शक विशाल भारद्वाज म्हणाला, ‘मी करिना कपूरचा खूप मोठा फॅन आहे आणि मी तिच्यासोबत यापूर्वी काम केले आहे. मात्र, तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करता येईल अशी अपेक्षा मी बाळगून आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे.’ ओमकारा या चित्रपटाची आठवण काढताना विशाल भारद्वाज याने त्यावेळी मला आलेला अनुभव हा चांगला होता असेही सांगितले.विशाल भारद्वाज यांच्या आगामी रंगून या चित्रपटाची कथा दुसºया महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून यात सैफ अली खान, शाहिद कपूर व अभिनेत्री कंगना राणौतच्या प्रमुख भूमिका आहेत. कंगनाचे कौतुक करताना विशाल भारद्वाज म्हणाला, कंगना आपल्या इंडस्ट्रीमधील सर्वात योग्य अभिनेत्री आहे. तिने या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. तिच्या कामाने आनंदी असून हा चित्रपट लोकांना खूप आवडेल अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने भारद्वाज याचे कौतुक केले होते. सैफ अली खानची भूमिका असल्याने करिनाने ‘रंगून’ या चित्रपटाचे कौतुक करीत हा या वर्षातला सर्वात हिट चित्रपट ठरेल, असे मत व्यक्त केले होते. ‘रंगून’ शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान या चित्रपटातील कंगनाने साकारलेली भूमिका ही फिअरलेस नादिया या अभिनेत्रीवर आधारित असल्याने वाडिया फिल्म्सने यावर आक्षेप घेतला होता.