लग्नानंतर लगेचच दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त झाल्यामुळे त्यांना एकत्र वेळ व्यतित करता आला नाही. विराट तर पत्नी अनुष्काला खूप मिस करीत असल्याचे त्याने अनेकदा बोलून दाखविले आहे. दौºयादरम्यान त्याने जाहीरपणे पत्नी अनुष्काचा बºयाचदा उल्लेखही केला आहे. आता तर त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबतचा एक कोजी फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो खुलेआम अनुष्काला किस करताना बघावयास मिळत आहे.
एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे पाणीपत केल्यानंतर पहिल्याच टि-२० सामन्यात आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर विराटने विजेयाचे श्रेय अनुष्काला दिले होते. विराटने म्हटले होते की, ‘मी तिला माझी बेस्ट मोटिवेशन मानतो.’ असो, आता विराट-अनुष्काचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, प्रेम व्यक्त करण्याचा ‘विराट’ अंदाज त्याच्या चाहत्यांना पसंत येत आहे. दरम्यान, चार वर्षे डेटिंग केल्यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी या दोघांनी इटली येथे लग्न केले होते.