विराट-अनुष्काच्या लव्हस्टोरीत नवा टिवस्ट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 10:28 IST
लव्हबर्ड्स क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लव्हस्टोरीत अनेक अडचणी आल्या. त्यानंतर त्या अडचणीवर मात करून ते ...
विराट-अनुष्काच्या लव्हस्टोरीत नवा टिवस्ट !
लव्हबर्ड्स क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लव्हस्टोरीत अनेक अडचणी आल्या. त्यानंतर त्या अडचणीवर मात करून ते दोघे पुन्हा एकत्र येतात. नुकतेच ते दोघे चंदीगढ इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले.त्यामुळे त्यांच्या लव्हस्टोरीत एक नवा टर्न, टिवस्ट आल्याचे जाणवते आहे. यावेळी ‘सुल्तान’ फेम अनुष्का ही फारच कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे विराट एकदम डॅशिंग दिसतो आहे.अनुष्का पंजाबमध्ये तिचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’ च्या निर्मितीअंतर्गत काम करते आहे. विराटनेही फिलौरीच्या सेटला नुकतीच भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत थोडासा वेळ घालवला. वेल, आता यांच्या लव्हस्टोरीला कोणाची नजर लागू नये एवढेच वाटते.