Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : ​सुश्मिता सेनने मुलीला विचारला प्रश्न! उत्तर ऐकल्यावर हसून हसून दुखेल पोट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:18 IST

दोन दिवसांपूर्वी सुश्मिताने एक अतिशय मजेशीर व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुश्मिताच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशा दिसत आहेत.

सुश्मिता सेन सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. अद्याप तरी कुठलाही नवा प्रोजेक्ट तिने साईन केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र सुश्मिता कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या सोशल अकाऊंटवर ती रोज नवे फोटो, व्हिडिओ अपलोड करत असते. कधी जिममधले फोटो, कधी पार्टीचे व्हिडिओ असे सगळे सुश्मिता पोस्ट करते. दोन दिवसांपूर्वी सुश्मिताने एक अतिशय मजेशीर व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुश्मिताच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशा दिसत आहेत. व्हिडिओत सुश्मिता  छोटी मुलगी अलिशाला ‘अल्टिमेटम’चे स्पेलिंग विचारतेय. अलिशाच्या तोंडून ‘अल्टिमेटम’चे स्पेलिंग ऐकणे, हीच या व्हिडिओतील मज्जा आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला अख्खा व्हिडिओ पाहायला हवा.ALSO READ : बुर्ज खलिफासमोर अशी बेधूंद नाचली सुश्मिता सेन! पाहा व्हिडिओ!!सुश्मिताने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर लोकांनी अतिशय पॉझिटीव्ह रिप्लाय दिले आहेत. अनेकांनी अलिशाची बाजू उचलून धरली आहे, ती कशी? अर्थात त्यासाठीही तुम्हाला व्हिडिओच बघावा लागेल. या व्हिडिओत सुश्मिता कुठेही दिसत नाही. पण तिचा आवाज मात्र जबरदस्त आहे. तिनेचं हा व्हिडिओ शूट केला आहे. २०१५ मध्ये ‘निर्बाक’ या बंगाली चित्रपटात सुश्मिता शेवटची दिसली होती. तेव्हापासून सुश्मिताच्या वापसीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अलीकडे एका मुलाखतीत सुश्मिता यावर बोलली होती. मी बॉलिवूडमध्ये नक्की परतेल. मला अशा स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे, जी मला सन्मान मिळवून देईल. मी माझ्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरी उतरू इच्छिते, असे ती म्हणाली होती.   इंडस्ट्रीत नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. रणदीपनंतर अगदी अलीकडे सुश्मिता मनिष मल्होत्राच्या पार्टीत एका तिच्यापेक्षा कमी वयाच्या तरूणासोबत दिसली होती. सुश्मिता या तरूणाच्या खूप क्लोज आहे, अशी चर्चा आहे.