Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral Pic :लंडनमध्ये हातात हात घालून फिरताना दिसले सनी देओल अन् डिम्पल कपाडिया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:02 IST

रणबीर व माहिरा या दोघानंतर सनी देओल आणि डिम्पल कपाडिया या दोघांचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून रणबीर कपूर व माहिरा खान या दोघांचे इंटिमेट फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. रणबीर व माहिरा या दोघानंतर सनी देओल आणि डिम्पल कपाडिया या दोघांचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. दोघेही हातात हात घालून लंडनच्या रस्त्यावर बसलेले आहेत. सनी व डिम्पलचा हा फोटो व्हायरल होताच दोघांच्याही अनेक वर्षे जुन्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. सनी देओल आणि त्याची एक्स गर्लफ्रेन्ड डिम्पल कपाडिया लंडनमध्ये स्पॉट झाल्याचे यात म्हटले आहे. या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट झालीय, ती म्हणजे आजही दोघांनी एकमेकांना सोडलेले नाही. आपला कुणी फोटो क्लिक करतयं, याबाबतही दोेघे बेफिकीर दिसताहेत.सनी देओल व डिम्पल कपाडिया या दोघांचे नाते आत्ताचे नाही तर बरेच जुने आहे. डिम्पल पती राजेश खन्नाचे घर सोडून एकटी वेगळी राहू लागली, तेव्हाची ही गोष्ट आहे. डिम्पलने सनीसोबत अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. याचदरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, ते दोघांनाही कळले नाही. यानंतर डिम्पल सनीसोबत एकत्र राहू लागली होती. इतकेच नाही तर डिम्पलच्या मुली टिष्ट्वंकल व रिंकी दोघीही सनी देओलला पापा म्हणून बोलवू लागल्या होत्या. खरे तर त्यावेळी डिम्पल व सनी लग्न करणार, अशीही चर्चा रंगली होती. दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचेही बोलले जाऊ लागले होते. पण दोघांनीही वेळोवेळी याचा इन्कार केला. हे नाते ११ वर्षे चालले आणि कदाचित अजूनही सुरु आहे. हा फोटो त्याचा पुरावा म्हणायला हवा.ALSO READ : बाप आणि मुलगा दोघांचीही हिरोईन बनली डिंपल कपाडिया!तसे पाहता, सनी प्रेमाच्या डावातला मुरलेला खेळाडू आहे. डिम्पलआधीही सनीच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अमृता सिंहसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. केवळ इतकेच नाही तर अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेन्ड रविना टंडन हिच्यासोबतही सनीचे नाव जोडले गेले. पण आता कदाचित सनी डिम्पलसोबत आनंदी आहे.