महाकुंभ मेळाव्यात रुद्राक्षाच्या माळा विकून लोकप्रिय झालेल्या मोनालिसा(Viral Girl Monalisa)ने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. मोनालिसा सर्वत्र चर्चेत आहे. व्हायरल होताच मोनालिसाला थेट चित्रपटाची ऑफर मिळाली. ऑफर मिळाल्यानंतर मोनालिसाचे नशीब पूर्णपणे बदलले आहे. ती आता तिच्या 'डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. तिचे अभिनयाचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे.
'डायरी ऑफ मणिपूर' हा चित्रपट सनोज मिश्रा दिग्दर्शित करत आहे. सनोज मिश्राने मोनालिसामध्ये खूप बदल केला आहे. तिचा मेकओव्हर करण्यात आला आहे. तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अलीकडेच मोनालिसाचा एक म्युझिक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंग खूप वाढ झाली आहे. आता चाहते तिच्या पहिल्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
पहिल्या सिनेमासाठी मोनालिसाला मिळालं इतकं मानधनमीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी मोनालिसाला २१ लाख रुपये मानधन मिळणार आहे. त्यापैकी तिला १ लाख रुपये एडव्हान्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर आता मोनालिसाने ब्रँड्सनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. ती एका ज्वेलरी ब्रँडचे प्रमोशन करत आहे. यासाठी तिला १५ लाख रुपये मिळाले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी मोनालिसाचे होर्डिंग्सही लावण्यात आले आहेत.
मोनालिसा अभिनयासाठी घेतेय प्रशिक्षणचित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाने तिचा आनंद व्यक्त केला. तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, ''मला कधीच वाटले नव्हते की माळा विकणाऱ्या मुलीला इतके प्रेम मिळेल. मी कठोर परिश्रम करेन आणि तुमचे प्रेम जपून ठेवेन.'' मोनालिसा मुंबईत अभिनयाचे धडे गिरवित आहे. तिचे गुरू तिच्यावर खूप मेहनत घेत आहेत. मोनालिसा अनेकदा तिच्या अभिनयाच्या वर्गांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिचे रील्स चाहत्यांना खूप आवडतात. मोनालिसाच्या म्युझिक व्हिडीओला लाखो व्ह्यूजही मिळाले आहेत.