Join us  

चप्पल मारुन सासूने केला होता रेखाचा गृहप्रवेश; अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 12:07 PM

Rekha: रेखाने गुपचूप पद्धतीने अभिनेता विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केलं होतं. हे लग्न विनोद मेहरा यांच्या आईला मान्य नव्हतं.

आपल्या सौंदर्याच्या जोरावर ९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha).  अभिनयशैलीमुळे चर्चेत येणाऱ्या रेखाचं फिल्मी करिअर जितकं चर्चेत राहिलं त्यापेक्षा कैकपटीने तिचं पर्सनल आयुष्य सगळ्यांसमोर उघड झालं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यांचं नात कोणापासूनही लपलं नाही. परंतु, अमिताभ बच्चनसोबतच त्यांचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा.

विनोद मेहरा (vinod mehara) आणि रेखा यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही तर विनोद मेहरांच्या आईला हे नात अजिबात मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी रेखाला चक्क चप्पलने मारलं होतं.

रेखा आणि विनोद मेहराने कोणालाही न सांगतला सिक्रेट वेडिंग केलं होतं. रेखा ही विनोद मेहरांची तिसरी पत्नी होती. मीडिया रिपोर्टनुसार, रेखा लग्न करुन सासरी गेल्यानंतर तिचं स्वागत थक्क करणारं होतं. तिच्या सासूने थेट तिला मारण्यासाठी धाव घेतली होती.

चप्पल मारून झाला रेखाचा गृहप्रवेश

घरी नववधू आल्यानंतर साधारणपणे तिचं जंगी स्वागत केलं जातं. दिव्यांची रोषणाई, फुलांची आरास, दारात तांदळाने भरलेलं मापटं ठेवून केलं जातं. मात्र, रेखाच्या बाबतीत सगळं उलटंच झालं.  रेखा ज्यावेळी सासरी पहिल्यांदा गेली त्यावेळी तिची सासू थेट तिच्या अंगावर धावून आली. विनोद मेहरांनी रेखासोबत लग्न केलं हे त्यांच्या आईसा अजिबात पटलं नव्हतं. या लग्नाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे रेखाला पाहिल्यावर त्या प्रचंड संतापल्या.

सासरी गेल्यानंतर रेखा सासूचा आशिर्वाद घेण्यासाठी खाली वाकल्या. परंतु, त्याचवेळी त्यांच्या सासूने तिला मारण्यासाठी चप्पल उचलली. पहिल्याच दिवशी सासूचं हे वर्तन पाहून रेखा प्रचंड दुखावली.

फार काळ नाही टिकला रेखा-विनोदचा संसार

रेखा आणि विनोद यांनी गुपचूप पद्धतीने जरी लग्न केलं असलं तरी त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर अवघ्या काही काळात त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, रेखासोबत विभक्त झाल्यानंतर विनोद मेहरा यांनी पुन्हा चौथ्यांदा लग्न केलं. किरण मेहरासोबत त्यांनी चौथी लग्नगाठ बांधली. मात्र, वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. तर, रेखाने बिझनेसमॅन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. मात्र, लग्नाच्या १ वर्षानंतर त्यांनी आत्महत्य करत जीवन संपवलं. 

टॅग्स :रेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअमिताभ बच्चनविनोद मेहरा