Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोद खन्ना यांनी मुंबईत घेतला शेवटचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 15:30 IST

सत्तर-ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारलेले अभिनेते यांचे निधन झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना ...

सत्तर-ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारलेले अभिनेते यांचे निधन झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना कॅन्सर झाला असून त्याच्यावर ते उपचार घेत होते. पण या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विनोद खन्ना यांचे निधन आज 11 वाजून 20 मिनिटांनी रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात झाले. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना काही दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातील फोटोमध्ये विनोद खन्ना यांना ओळखणेदेखील कठीण झाले होते. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या फोटोत विनोद खन्ना कमालीचे अशक्त दिसत होते. विनोद खन्ना यांना ब्लॅडर कॅन्सर झाला होता. विनोद खन्ना यांच्या आगामी ‘एक राणी ऐसी भी’चे ट्रेलर लॉचिंगचा इव्हेंट काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आला होता. या इव्हेंटसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना या इव्हेंटला उपस्थित राहू शकले नाहीत. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’,‘कुर्बानी’,‘पूरब और पश्चिम’,‘रेशमा और शेरा’,‘हाथ की सफाई’,‘हेराफेरी’ अशा अनेक चित्रपटांत शानदार अभिनय केला.  विनोद खन्नाच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने झाली होती. पण नंतर  विनोद खन्ना हिरो म्हणून नावारूपास आलेत. १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. अलीकडे शाहरूख खान व काजोल स्टारर ‘दिलवाले’ या चित्रपटात ते दिसले होते.आणखी वाचा ः विनोद खन्ना यांना ओळखणेही झाले कठीण!!