विन-डिप्पीचा स्टनिंग स्टिल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 22:48 IST
दीपिका पदुकोनने हॉलीवूडमध्ये एन्ट्री के ली आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. तिच्या ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू ...
विन-डिप्पीचा स्टनिंग स्टिल!
दीपिका पदुकोनने हॉलीवूडमध्ये एन्ट्री के ली आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. तिच्या ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विन डिझेल सोबत ती या चित्रपटात काम करत आहे. हा अॅक्शन चित्रपट असल्याने सर्वच चाहत्यांमध्ये खुप उत्सुकता निर्माण करत आहे.‘पिकू स्टार’ दीपिका नव्या सिझलिंग अवतारात एकदम हॉट दिसत आहे. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटाने नुकताच एक स्टील फोटो रिलीज केला आहे. या फोटोत दीपिका आणि विन काही इंटिमेट सीन्स शेअर करत आहेत. दोघांमधील केमिस्ट्री खुप जास्त प्रमाणात हॉट दिसत आहे.सगळ्यांचे लक्ष वळवण्यासाठी हे सीन्स यात घेतल्यासारखे वाटते. ट्रिपल एक्स सीरिजचा हा तिसरा भाग आहे. या दोघांशिवाय सॅम्युअल एल. जॅकसन आणि डोनी येन हे देखील मुख्य भूमिकेत असतील.