विन डिझेलचे भारतात येण्याचे स्वप्न झाले साकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 15:33 IST
हॉलिवूड अॅक्शन हिरो विन डिझेल सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात येणे हे माझे स्वप्न साकार होण्यासारख असल्याची भावना व्यक्त ...
विन डिझेलचे भारतात येण्याचे स्वप्न झाले साकार
हॉलिवूड अॅक्शन हिरो विन डिझेल सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात येणे हे माझे स्वप्न साकार होण्यासारख असल्याची भावना व्यक्त केली. माझ लहानपणापासून भारतात येण्याचे स्वप्न होते ते आज यानिमित्ताने पूर्ण होतय..विन डिझेल सध्या भारतात 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला आहे. या त्याच्या खास दौऱ्याचे आयोजन दीपिका पादुकोणने केले आहे. 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटात विन डिझेलसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार आहे. 14 जानेवारी संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर 20 जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होणार आहे. विन डिझेलसह 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’चा दिग्दर्शक डी जे कारुसोही भारतात आला आहे. 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’या अॅक्शनपटाच्या माध्यमातून दीपिका आपल्या हॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात करतेय. विन डिझेलचे मुंबई विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रीयन पद्धतीने विनचे स्वागत करण्यात आले. दीपिकाने पाहुणचारात कुठलीच कसर ठेवली नाही. 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’चा भव्य दिव्य प्रिमिअर पार पडला.यावेळी रणवीर सिंगसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती. त्याआधी त्यांने त्याच्या चाहत्यांशी संवादही साधला. यावेळी दीपिका पादुकोणचे त्यांने कौतुक केले. दीपिका आपल्याला एखाद्या राणीसारखे भासते असे विन डिजेल म्हणाला. तर दीपिकानेही माझे भाग्य जे मला मला विनसोबत काम करण्याची संधी मिळाली असे म्हटले. दोन दिवसांचा भारतीय दौऱ्यात विनचे शेड्युल अतिशय व्यग्र आहे.