Join us  

विक्रांत मेस्सीने मागितलेली सारा अली खानची माफी, नेमकं काय होतं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:50 AM

12th फेल अभिनेत्याला का मागावी लागली सारा अली खानची माफी?

12th फेल सिनेमातून आपल्या अभिनयाचं अद्भूत दर्शन घडवणारा अभिनेता विक्रांत मेस्सी Vikrant Massey). कमी बजेटमध्ये बनलेल्या विधू विनोद चोप्रा यांच्या या सिनेमाने सर्वांची वाहवाही मिळवली. बॉक्सऑफिसवरही सिनेमाने बक्कळ कमाई केली. सर्वांनाच विक्रांत आणि इतर कलाकारांचा अभिनय भावला. IPS मनोज शर्मा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित होता. विक्रांत मेस्सी हे नाव इंडस्ट्रीत नवीन नाही. मात्र त्याने मोठ्या संघर्षातून हे नाव कमावलं आहे. विक्रांतही स्टारकीड्सबाबत वेगळा विचार करायचा. त्याच्या विचारांमुळे त्याला सारा अली खानची माफीही (Sara Ali Khan) मागावी लागली. काय आहे तो किस्सा?

विक्रांत स्वत: इंडस्ट्रीत आऊटसाइडर आहे. त्यामुळए साहजिकच विक्रांतही स्टारकीड्सला जज करायचा. पण जेव्हा त्याला चूक समजली तेव्हा त्याने सारा अली खानची माफी मागितली. होय, नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया. विक्रांतने सारा अली खानसोबत 'गॅसलाईट' सिनेमात काम केले होते. एका मुलाखतीत विक्रांत म्हणाला, "नेपोटिझमची चर्चा तेव्हा जोरात होती. दुर्भाग्याने मी सुद्धा स्टारकीडबद्दल तसाच विचार करायचो. मी सारा अली खानबद्दलही तेच गृहित धरलं होतं. एकत्र काम करताना मला वाटलं साराची प्राथमिकता हेअर मेकअप या गोष्टी असतील. पण जेव्हा मी सेटवर तिची मेहनत बघितली तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. मी लगेच जाऊन तिची माफीही मागितली."

तेव्हा सारा मला म्हणाली, "मला याची सवय झाली आहे. मला माहित आहे मी कुठून आलीए, मी कोण आहे. मला लोक गृहितच धरणार पण मला फरक पडत नाही. पण लोक समजूतदार आहेत हेही मी जाणते."

विक्रांत मेस्सी आणि सारा अली खान यांचा 'गॅसलाईट' सिनेमा मिस्ट्री आणि थ्रिलरने भरलेला होता. मात्र प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. 

टॅग्स :विक्रांत मेसीसारा अली खानबॉलिवूडसिनेमा