Join us

लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:22 IST

महिनाभरापूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाला अभिनेता

'गली बॉय', 'डार्लिंग्स', 'जाने जान' या सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आता हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केल्यानंतर विजयला आता इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आलं आहे. मध्यंतरी विजय तमन्ना भाटियासोबतच्या अफेअरमुळे आणि नंतर ब्रेकअपमुळेही चर्चेत आला होता. तर आता त्याने महिनाभरापूर्वीच मुंबईत आलिशान सी फेसिंग घर घेतलं आहे. नुकतीच याची झलक सोशल मीडियावर समोर आली आहे.

फराह खान तिचा कुक दिलीपसोबत अनेक सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि त्यांच्याकडील स्पेशल रेसिपी दाखवते. नुकतीच ती विजय वर्माच्या घरी गेली होती. महिनाभरापूर्वीच आपण मुंबईत हे सी फेसिंग घर घेतल्याचं त्याने फराह खानला सांगितलं. यावेळी विजयने घराची झलक दाखवली. विजयचा हा फ्लॅट अगदी आलिशान आहे. तरी त्याने अगदी साध्या गोष्टींसह फ्लॅट डेकोरेट केला आहे. मोठा टीव्ही, लाईट्स, व्हाईट-ग्रे सोफा, छोटा डायनिंग टेबल, सुंदर किचन, त्याला लागूनच छोटी बाल्कनी, आलिशान बेडरुम आणि सी फेसिंग गॅलरी असा त्याचा लक्झरीयस फ्लॅट आहे. विजय नुकताच फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला असून तोही या व्ह्यूचा आनंद घेताना दिसतोय.

तमन्ना भाटियाच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या विजयनेच तिच्याशी ब्रेकअपचा निर्णय घेतला होत अशी बातमी तेव्हा समोर आली होती. तमन्नाला लग्न करायचं होतं आणि विजयला मात्र आताच लग्नाची घाई करायची नव्हती. म्हणून त्यांनी नातं संपवायचा निर्णय घेतला. यानंतर विजय आता नवीन घरात शिफ्ट झाला आहे.

विजय वर्मा आगामी 'मटका किंग' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. नागराज मंजुळेंनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये सई ताम्हणकरही मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमुंबईसुंदर गृहनियोजन