Join us  

छेडछाड आरोपानंतर विजय राजला आणखी एक फटका, निर्मात्यांचं होणार २ कोटींचं नुकसान

By अमित इंगोले | Published: November 05, 2020 1:38 PM

आता विजय राजला सिनेमातून काढल्यामुळे निर्मात्यांना रिशूट करावं लागणार आहे. म्हणजे विद्या बालनसहीत इतरही कलाकारांनी सीन रिक्रिएट करावे लागणार आहेत.

महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता विजय राजला विद्या बालन स्टारर 'शेरनी' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विजय राजला सिनेमातून काढल्यावर निर्मात्यांना दिवसाच्या हिशेबाने २० लाख रूपयांचा तोटा होणार आहे. कारण विजय राज सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलपासून आहे. 

आता विजय राजला सिनेमातून काढल्यामुळे निर्मात्यांना रिशूट करावं लागणार आहे. म्हणजे विद्या बालनसहीत इतरही कलाकारांनी सीन रिक्रिएट करावे लागणार आहेत. विजय राजने एकूण २२ दिवसांपासून शूटमध्ये होता. अशात दोन कोटी रूपयांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे निर्मात्यांनी विजय राजला लगेच सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्याजागी आता दुसरा कलाकार कास्ट केला जाईल.

असिस्टंट डायरेक्टर आहे पीडिता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'केवळ १३ दिवसांआधी फिल्मचं दुसरं शेड्यूल बालाघाटमध्ये सुरू झालं होतं. पहिलं शेड्यूल लॉकडाऊनआधी भूतपलासी गावात १३ दिवसांसाठी झालं होतं. त्यानंतर बालाघाटमध्ये २९ ऑक्टोबरला सगळ्यांसमोर विजय राजवर एका असिस्टंट डायरेक्टरने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप लावला. आधी तर प्रॉडक्शनच्या लोकांसमोर विजय राजने या पीडितेला विजय राजने माफी मागितली. पण दोन तीन दिवसांनंतर पीडितेने विजय राज विरोधात तक्रार दाखल केली.

विजय राजने मागितली माफी

सूत्रांनी सांगितले की, ही घटना व्हॅनिटी व्हॅनच्या आत किंवा हॉटेलमध्ये बोलवून गैरवर्तन करण्याची नाही. सेटवर विजय राजने पीडितेच्या खांद्यावर हात ठेवला. विजय राजने सांगितले की, यामागे त्याचा उद्देश चुकीचा नव्हता. पीडितेच्या वयाची त्याला मुलगी आहे. मुलीच्या वयाच्या मुलीसोबत असं करण्याचा तो स्वप्नातही विचार करू शकत नाही. तरी जर पीडितेला चुकीचं वाटलं असेल तर त्यासाठी माफी मागतो. मात्र, पीडिता त्याला माफ करू शकली नाही.

घटनेच्या तीन दिवसांनंतर पीडितेने विजय राजवर केस दाखल केली. सूत्रांनी सांगितले की, या घटनेमुळे विद्या बालन आणि इतर कलाकार धक्क्यात आहेत. पण ते म्हणतात ना 'शो मस्ट गो ऑन' तसं शूटींग सुरूच राहणार आहे.

विजय राजला मिळाल जामीन

पीडितेच्या तक्रारीनंतर विजय राजला मंगळवारी गोंदिया जिल्हा पोलिसांनी एक अटक केली होती. अटकेनंतर विजय राज याला काही वेळाने जामीनावर सोडण्यात आले होते. 

टॅग्स :विजय राजबॉलिवूडलैंगिक छळ