View Pics : ‘जुडवा-२’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहचली वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 21:50 IST
अभिनेता वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून जाहीर केले होते की, त्याच्या आगामी ‘जुडवा-२’चे ट्रेलर येत्या सोमवारी रिलीज ...
View Pics : ‘जुडवा-२’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहचली वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलाल
अभिनेता वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून जाहीर केले होते की, त्याच्या आगामी ‘जुडवा-२’चे ट्रेलर येत्या सोमवारी रिलीज केले जाणार आहे. चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता पाहता, ट्रेलरनंतरच चित्रपटाच्या यशाअपयशाचे गणित जुळविणे शक्य होणार आहे. वास्तविक आतापर्यंत चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वरुणने काही स्पेशल लोकांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. त्यासाठी गर्लफ्रेंड नताशा दलाल हीदेखील उपस्थित होती. हे दोघे जेव्हा थियटरच्या बाहेर येत होते, तेव्हा माध्यमांच्या कॅमेºयात त्यांची छबी टिपण्यात आली. यावेळी नताशा आणि वरुण दोघेही खूश दिसत होते. नताशाच्या चेहºयावरील भाव पाहता तिला हा चित्रपट आवडला असावा. खरं तर डेव्हिड धवन यांचे दिग्दर्शन असल्याने या चित्रपटात धमाल मस्ती असेल यात शंका नाही. कारण डेव्हिड यांचा इंडस्ट्रीतील प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांनी या चित्रपटात तो सर्व मसाला टाकला असेल यात शंका नाही. नताशा आणि वरुणच्या नात्याबद्दल सांगायचे झाल्यास या दोघांना बºयाचदा एकत्र बघण्यात आले आहे. त्यानंतरच यांच्यातील अफेअरच्या माध्यमांमध्ये चर्चा रंगविण्यास सुरुवात झाली. वास्तविक दोघांनीही आतापर्यंत त्यांच्यातील नात्याची जाहीरपणे वाच्यता केली नाही. शिवाय एकमेकांवर प्रेम असल्याची कबुलीही दिली नाही. परंतु हे दोघे रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील असेच काहीसे दिसत आहे. वरुणच्या प्रोफेशनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास तो ‘जुडवा-२’मध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचबरोबर सलमान खानदेखील या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळेल. दरम्यान, उद्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असून, त्यामध्ये वरुणचा कसा जलवा असेल हे दिसून येईल.