Join us
Daily Top 2Weekly Top 5

View Pic : मालिबू बीचवर शाहरूख खानची मुलगी सुहानाचा दिसला बोल्ड अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:27 IST

गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये गौरीसह, सुहाना आणि अबराम दिसत आहेत.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नुकताच लॉस एंजेलिस येथून सुट्या एन्जॉय करून मुंबईत परतला आहे. मुंबईत येताच तो त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्तही झाला आहे, तर शाहरूखची पत्नी गौरी, मुलगी सुहाना, आर्यन आणि अबरामबरोबर अजूनही लॉस एंजेलिस येथे सुट्या एन्जॉय करीत आहेत. गौरीने काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, गौरी आणि तिची मुले सुटीचा भरपूर आनंद घेत आहेत. या फोटोंमध्ये आणखी एक गोष्ट आकर्षित करणारी आहे, ती म्हणजे सुहानाचा बोल्ड अंदाज. होय, गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये गौरीसह, सुहाना आणि अबराम दिसत आहेत. तिघेही लॉस एंजेलिसच्या मालिबू बीचवर आराम करताना दिसत आहेत. फोटोमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत आहे. तर सुहाना निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे, तर अबराम आपल्या जगात रमलेला दिसत आहे. तिघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा फोटो अपलोड करताच त्यांच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेण्टचा पाऊस पाडला आहे.  नुकतेच शाहरूख खानने एका मुलाखतीत म्हटले होते की, परिवारासोबत बाहेर जाण्यासाठी मोठ्या मुश्किलने वेळ मिळतो. त्याचबरोबर शाहरूखने हेदेखील स्पष्ट केले होते की, मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी माझ्या परिवाराला घेऊन जात नाही. कारण मी एक स्टार आहे, त्यामुळे साहजिकच मी जिथे जाणार तिथे गर्दी होणार. या गर्दीचा मी गेल्या २५ वर्षांपासून सामना करीत आहे. परंतु माझ्या परिवाराने त्याचा सामना करावा, असे मला अजिबातच वाटत नाही. यावेळी शाहरूखने मीडियाचा सामना करणे माझ्या मुलांना आता जमत असल्याचेही म्हटले होते. दरम्यान, शाहरूख सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची प्रमुख भूमिका आहे. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. दोन भिन्न विचारांच्या तरुण-तरुणीची कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे.