'फोर्स' आणि 'कमांडो' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अॅक्शन आणि अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विद्युत जामवाल सध्या चर्चेत आला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वेबसाईटने जगातील टॉप मार्शल आर्ट आर्टिस्टची यादी जाहीर केली आहे. या यादीत विद्युत जामवालच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. विद्युत जामवाल एकमेव भारतीय आहे, ज्याचे नाव या यादीत आहे. विद्युतने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले असून नुकतेच त्याने आगामी चित्रपट 'जंगली'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
मार्शल आर्टचा प्रकार कलारीपायट्टू संपूर्ण जगासमोर आणण्याचे विद्युत जामवालचे स्वप्न आहे. जगातील टॉप मार्शल आर्ट आर्टिस्टची यादीत विद्युतच्या नावाचा समावेश झाल्यानंतर तो म्हणाला की,' माझ्यासाठी ही सन्मानाची बाब असून मी अजून मेहनत करावी यासाठी मला प्रेरित करण्यात आले आहे. मी भारतीय असल्याचा मला या क्षणामुळे अभिमान वाटत आहे. 'विद्युतचा आगामी चित्रपट 'जंगली' एक अॅडव्हेंचर असून चित्रपटात त्याचे जनावरांवर खूप प्रेम असते असे दाखवले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा माणूस आणि जनावरांमधील प्रेम दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटातील काही दृश्यदेखील व्हायरल झाली होती. विद्युतचे 'जंगली' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट ५ एप्रिल, २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चक रसलने केले आहे.